
'जर तुम्ही मतदान केले नसेल तर तुम्हाला सरकारला काही बोलण्याचा हक्क नाही', अशा आशयाचे वाक्य सिनेमात/इतरत्र भरपूर वेळा ऐकले होते, पटतही होते. जरी गेले काही वर्षे मी मतदान करावेच ह्या मतावर होतो तरी सध्याच्या परिस्थितीत वाटत होते की मतदान करावे की नाही? खरंतर ह्याच्या कारणाचाही उहापोह करणे गरजेचे नाही...