मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे...
जुलै ३१, २००८
जुलै २७, २००८
जुलै २७, २००८ १०:११ PM
देवदत्त
दूरदर्शन, प्रश्नमंजुषा
0 प्रतिक्रिया
शाहरूख खान शिक्षक असलेल्या ’क्या आप पांचवी पास से तेज हैं’ ची आज सांगता झाली.
त्याची सुरूवात आणि शेवट दोन्ही, नाही हो, एकंदरीत पूर्ण कार्यक्रम मला तरी आवडला. सुरूवात ह्यासाठी की त्यांनी केलेला प्रचार किंवा जाहिरातबाजी, आणि मुख्यत्वे काहीतरी वेगळा व माहितीदर्शक कार्यक्रम.(नाहीतर काय, त्यातील किती प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत होती?) ह्या कार्यक्रमाआधी दररोज रात्री आठ वाजता शाळेची घंटी वाजवायचे. तसेच बहुतेक काय सर्वच कार्यक्रमाच्या मध्ये त्याची...
जुलै २१, २००८
जुलै २१, २००८ ७:५० PM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
गेले १५-२० दिवस चर्चेत असलेल्या श्री. मनमोहन सिंग ह्यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाची कृती आज सुरू झाली. आत्ता रात्रीचे ८ वाजत आले आहेत तरीही बहुतेक सर्व (?) पक्षाचे खासदार संसदेत उपस्थित राहून चर्चा करीत आहेत. जेव्हा स्वत:च्या भवितव्याची चिंता ग्रासू लागली तेव्हा हे सर्व लोक जमा आहेत. मग तसाच देशाच्या भवितव्याचा विचार करून जर दररोज त्यांची उपस्थिती राहिली व काही चांगले कार्य केले तर ह्या सर्व ठरावांची गरजच भासणार नाही असे वाटते. पण बहुधा आज...
जुलै १४, २००८
जुलै १४, २००८ १२:३२ AM
देवदत्त
अनुभव
2 प्रतिक्रिया
"अरे भैय्या, दुसरी नोट दो. यह नही चलेगी." "चल जायेगी साब, नही चली तो बाद में मुझे वापस कर देना."
मुंबईच काय, भारतातील बहुतेक शहरात चालणारा संवाद. कारण काय तर नोट बहुतेक वेळा थोडी फाटलेली असते, किंवा जुनी झालेली असते. आणि काय करणार? आपल्यालाच धास्ती असते की ती नोट जर दुसर्या कोणी घेतली नाही तर तेवढ्या रूपयांचा फटका बसायचा. ह्या आणि अशा आणखी इतर प्रकारात आपल्याला नोटांचे हाताळणे का चांगले ठेवावे हे कळते :) काही वर्षांपूर्वी नागपूरात तर पूर्णपणे...
जुलै ०८, २००८
जुलै ०८, २००८ १:५६ AM
देवदत्त
दूरदर्शन
0 प्रतिक्रिया
सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)