जानेवारी १५, २०१६

गेल्या काही दिवसांपासून एक बातमी, विडीयो आंतरजालावर फिरत आहे की जापानमध्ये एक रेल्वे स्थानक बंद करण्याच्या स्थितीत आले आहे.  पण फक्त एक प्रवासी जी तिच्या शिक्षणाकरीता त्या स्थानकावरून प्रवास करते तिच्याकरीता ते स्थानक सुरू ठेवणार आहेत. मार्च २०१६ मध्ये तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते हे स्थानक बंद करतील. एका नागरीकाच्या शिक्षणाकरीता असे करणे हे खरोखरच स्पृहनिय आहे.



आपल्याकडे असे काही झालेले लक्षात नाही. कारण एकतर ते होत नाही किंवा सर्वांच्या समोर येत नाही. अर्थात आपल्याकडेही एखाद्या प्रवाशाकरीता ट्रेन थांबविणे, विमान थांबविणे हे होते, पण ते 'विशेष' नागरिकांकरीता. त्यातही बदल होत चालला आहे हे बरे.

(विडीयो स्त्रोत - यूट्यूब)

जानेवारी १३, २०१६

नेहमीप्रमाणे काल ऑफिसला दुचाकीने जात होतो. मुलुंड टोलनाक्यावर सर्वात डाव्या बाजूने दुचाकी आणि रिक्षांना जाण्याकरीता जो मार्ग दिलेला आहे, दररोज तिथे भरपूर गर्दी असते. सर्वच चालकांना आपली गाडी पुढे दामटायची असते. मग काही लोक चारचाकींकरीता (किंवा खरं तर इतर सर्व गाड्यांकरिता) असलेल्या रांगेतून आपली गाडी पुढे नेतात. पुढे वाहतूक पोलिस उभे असतात पण ते सहसा ट्रक, टेम्पो ह्यांना थांबवून त्यांची कामे करीत असतात. पण काल खाकी वर्दीधारी पोलिसही प्रत्येक मार्गिकेसमोर उभे होते. वाटले, 'वा, चांगले आहे. कोणीतरी येत असेल.'

मी सहसा इतर मार्गिकेमधून जात नाही. पण गर्दी पहिल्या रांगेत खुपच ओढाताण वाटली म्हणून दुसर्‍या रांगेतून गाडी पुढे घेतली तर नेमके मला पोलिसांनी थांबविले. मग नेहमीचेच सोपस्कार (लायसन्स, गाडीची कागदे) झाल्यावर मी विचारले.


पूर्ण संभाषण देत नाही, त्याचा गोषवारा.


मी : "मला नक्की का थांबविले ते तर सांगा. पुढील वेळी लक्षात ठेवेन :)..."

पो : "काय राव, तुम्हालाही सर्व समजवावे लागेल का?..."
मी : मी ह्या रांगेतून नेहमी येत नाही, आज आलो म्हणून अडविले. पण मग इतरांनाही अडवा की..."
त्यांचे म्हणणे होते की एकालाच सगळे जमत नाही.


मग  आणखी थोडी चर्चा करून मी पुढे निघालो.


ऑफिस मध्ये आल्यावर सहकार्‍याशी बोलताना कळले की वाहतूक विभागाचा सुरक्षा सप्ताह सुरू आहे. मग सगळी गोष्ट लक्षात आली.


संध्याकाळी घरी जाताना त्याच टोलनाक्यावर पाहिले तर आमच्या (म्हणजे दुचाकी/रिक्षाच्या) रांगेला अडवून बेस्टची बस त्यांच्या पहिल्या रांगेत घुसत होती.

आता ह्या लोकांना पोलिसांनी का थांबवले नाही हा प्रश्न विचारावासा वाटला, पण नाही विचारला.

(प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार)


फेब्रुवारी २६, २०१५


रेल्वे अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधी लोकांच्या अपेक्षा होत्या की रेल्वेभाडे कमी व्हावे, नवीन गाड्या सुरू व्हाव्यात, बुलेट ट्रेन बद्दल काही निर्णय घेतला जाईल वगैरे वगैरे. मला ह्यातील गोष्टी सध्या नको होत्या. कारण भाडे वाढले आहे ते कमी होणार नाहीच. पण नवीन भाडेवाढ नको, बुलेट ट्रेन नको पण आहेत त्या गाड्या आधी नीट चालवा, लोकांना सुधारीत सेवा द्या. तिकिट काढण्यासाठी चांगली सुविधा द्यावी.

आज तो अर्थसंकल्प सादर झाला. त्यात मला अपेक्षित गोष्टी होत्या ते चांगले वाटले.



(प्रकाशचित्रः आंतरजालावरून साभार)


फेब्रुवारी १९, २०१५


दररोज दुचाकीने ऑफिसला जाताना एक गोष्ट जाणवली. लहान (दुचाकी) गाड्या छोट्याशा जागेतून निघून पुढे जाऊ शकतात. ते लोक फुटपाथवरून जातात हा भाग सध्या सोडून द्या.  पण कार, ट्रक, बस अशा मोठ्या गाड्या जेव्हा आपली गाडी जाऊ शकत नाही तरी समोरील जागा अडवून उभे राहतात.

अशावेळी मोठ्या गाड्यांनी आपला अहंकार :) बाजूला ठेवून थोडीशी जागा दिली, तर लहान गाड्या आपल्या प्रवासाच्या ठिकाणावर लवकर पोहोचू शकतात.

हीच गोष्ट जीवनातील इतर गोष्टींनाही लागू होते, नाही का?

(प्रकाशचित्रः आंतरजालावरून साभार)


ऑगस्ट ०५, २०१४


हम आपके हैं कौन?
आजपासून बरोबर २० वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट १९९४ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुरूवातील लग्नाच्या गाण्यांचे चित्रहार, साडे तीन तासांचा लांबलचक चित्रपट म्हणून टीका झाली. पण चांगला चित्रपट आहे आवडला असेही लोक सांगू लागले. निर्माते बडजात्या यांनी चित्रपटाची व्हिडीयो कॅसेट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याच दिवशी बाजारात न आणता, संपूर्ण भारतात फक्त २७ प्रती काढून प्रदर्शित केला आणि त्याची तिकीटही जास्त ठेवली. पण तरीही प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिला.

घरातील मंडळी चित्रपट पाहून आली. आल्यानंतर काही दिवस ह्याच चित्रपटाची चर्चा. त्यामुळे ह्या चित्रपटाविषयी आकर्षण निर्माण झाले होते. पण मला बारावीचे वर्ष असल्याने चित्रपटगृहात जाण्याची संधी मिळाली नाही.

त्यानंतर १ वर्षांनी म्हणजे जुलै १९९५ मध्ये हा चित्रपट पाहण्याचा योग आला, तोही त्यांच्या मुख्य चित्रपटगृहात 'लिबर्टी चित्रपटगृह'. तेव्हा त्यांनी चित्रपटाला ५० आठवडे पूर्ण झाले म्हणून २ गाणी आणि १० दृश्ये नवीन जोडलीत असे ऐकले होते. ती दोन गाणी म्हणजे चॉकोलेट लाईम ज्यूस.. आणि मुझसे जुदा होकर... दृश्ये नवीन कोणती ते कळण्याचा मार्ग नव्हता, पण ह्या गाण्याच्या आधीचे २-३ तर नक्कीच असतील.
म्हणजेच मी पहिल्यांदा चित्रपट पाहिला तो पूर्ण. आधीच्या लोकांनी पाहीला तसा निर्बंधित नाही. ;)

त्यानंतर पुन्हा १ वर्षांनी महाविद्यालयीन काळात पाहिला लोणी येथील चित्रपटगृहात. पहिल्यांदा पाहिला तेव्हा ८० रू तिकीट होते आणि नंतर पाहिला तेव्हा ५ रू तिकीट. पण दोन्ही वेळेला पूर्ण ३:४० तासांचा, २ इंटर्व्हल सोबत.

चित्रपटाच्या कथा आणि गाण्यांबद्दल बोलायला नकोच सर्वांनाच माहित आहे. पण एवढेच सांगतो की हा चित्रपट तेव्हाही आवडला होता, आताही आवडतो. कधीही दूरदर्शन वाहिन्यांवर लागला तर जमेल तेवढा नक्की पाहतो. 

(प्रकाशचित्रः आंतरजालावरून साभार)


इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter