गेल्या काही दिवसांपासून एक बातमी, विडीयो आंतरजालावर फिरत आहे की जापानमध्ये एक रेल्वे स्थानक बंद करण्याच्या स्थितीत आले आहे. पण फक्त एक प्रवासी जी तिच्या शिक्षणाकरीता त्या स्थानकावरून प्रवास करते तिच्याकरीता ते स्थानक सुरू ठेवणार आहेत. मार्च २०१६ मध्ये तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते हे स्थानक बंद करतील. एका नागरीकाच्या शिक्षणाकरीता असे करणे हे खरोखरच स्पृहनिय आहे.
आपल्याकडे असे काही झालेले लक्षात नाही. कारण एकतर ते होत नाही किंवा सर्वांच्या समोर येत नाही. अर्थात आपल्याकडेही एखाद्या प्रवाशाकरीता ट्रेन थांबविणे, विमान थांबविणे हे होते, पण ते 'विशेष' नागरिकांकरीता. त्यातही बदल होत चालला आहे हे बरे.
(विडीयो स्त्रोत - यूट्यूब)

0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा