गेल्या काही वर्षांत ५० रूपयांची नोट मिळणे बंद झाले होते असे मी अनुभवले. तुम्हालाही अनुभव आला होता का?
एटीएम मध्ये तर १०० रूपयांपेक्षा कमीच्या नोटा मिळत नाहीत हे कारण असेल. पण दुकानांतूनही पैसे परत मिळाले की १०० किंवा मग २०, १० च्या नोटाच परत मिळायच्या. अर्थात रिझर्व बँकेने ह्यावर निर्बंध आणले नाहीत. पण जसे २५ पैशांच्या नाण्यांचे झाले होते तसा काहीसा प्रकार होता का अशीही मला शंका आली होती. रिझर्व बँकेने २५ पैशाची नाणी बंद केली नव्हती, पण दुकानात, बसमध्ये ही नाणी वापरणे बंद झाले होते. आता तीच गत ५० पैशांच्या नाण्याचीही होत आहे असे दिसते.
५० रुपयांची किंमत अर्थातच त्या नाण्यांप्रकारे कमी नाही. खरं तर असेही वाचले ऐकले आहे की अर्थशास्त्राप्रमाणे भारतातील चलनात कमाल ५० रुपयांचीच नोट असायला पाहीजे. पण सरकारने आपले काही मुद्दे वापरून १००, ५००, १०००च्या नोटा वापरात ठेवल्या आहेत तो भाग सध्या वगळू.
तर ५० रुपयांची नोट मिळणे बंद झाले होते. मग दोन वर्षांपूर्वी रिझर्व बँकेने २००५ च्या आधीच्या सर्व किंमतींच्या नोटा चलनातून बाद करण्याचे ठरविले व नागरिकांना विनंतीवजा सूचना केली की त्यांनी २००५च्या आधीच्या नोटा बँकामध्ये देऊन नवीन नोटा घ्याव्यात. पण लोकांनी नेहमीप्रमाणे ती सूचना गंभीरतेने घेतली नाही. रिझर्व बँकेला त्याची मुदत तर वाढवावी लागलीच, पण बहुतेक लोकांनी सर्व जुन्या नोटा बँकांना न देता त्या बाहेर वापरायला सुरूवात केली. त्यातच ह्या ५० च्या नोटा बाहेर आल्या असे दिसतेय. २००५च्या आधीच्या आणि नंतरच्याही.
आता २००५ आधीच्या नोटा तर कमी दिसत आहेत. पण निदान ५० रू च्या नोटा पुन्हा वापरायला मिळत आहेत हे चांगले झाले.
जाता जाता: तसे तर ५रूपयाच्या नोटाही फार कमी दिसत आहेत. त्याही बंद झाल्यात का? :)
(चित्र स्त्रोत: विकिपिडीया)