गेले २ दिवस 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ची गाणी ऐकली. पुन्हा एकदम ताजेतवाने वाटायला लागले. पूर्ण ७ गाणी त्याच प्रकारे ज्या प्रकारे कॅसेट मध्ये आहेत. एकामागोमाग एक. त्याच क्रमात :)
आणि मग सिनेमाही डोळ्यांसमोर आला.
नाही. मी ह्या सिनेमाचे किंवा गाण्यांचे परीक्षण लिहिणार नाही आहे. १५ वर्षांनंतर त्या सिनेमाचे परीक्षण लिहिण्यात काय मजा नाही. मजा आहे ती हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहण्यात. इथे लिहिणार ते फक्त मनातील विचार.
हा सिनेमा मला खूप आवडला. पहिल्यांदा पाहीला तेव्हा मधूनच पाहिला होता. तेव्हा माझे अभियांत्रिकीचे पहिले वर्ष होते. दिवाळीच्या सुट्टीत घरी आलो, तेव्हा पाहणार होतो. पण नाही जमले. पण एकदा कसातरी पोहोचलो सिनेमाला. त्यांची ट्रेन सुटते तेव्हापासूनचा पाहिला. तेव्हा काही खास वाटला नाही. पण त्यानंतर जेव्हा पूर्ण पाहिला तेव्हा आवडला. नंतर पाहत गेलो आणखी आवडत गेला. त्यानंतर १ २ वर्षात १७ वेळा चित्रपटगृहात जाऊन पाहिला. नंतर त्याची व्हीसीडी आली त्यानंतर किती वेळा पाहिला त्याची गणती नाही. :)
महाविद्यालयाच्या दुसर्या वर्षी हा सिनेमा त्या गावी आला. पहिल्याच दिवशी पहायला गेलो. तिकडे काय ओपन थियेटर. आत खुर्च्या नाहीत. खडी/वाळुवर बसायचे. त्या सिनेमाची लोकप्रियता माहित होती आणि आमचा आवडता सिनेमा. म्हणून भरपूर आधी जाऊन बसलो. गेलो तेव्हा पूर्ण मोकळे मैदान. पण चित्रपट सुरू होईपर्यंत एवढी गर्दी झाली की इकडे तिकडे हलायला जागा नव्हती. आणि जास्त करून आम्ही विद्यार्थीच. अभियांत्रिकी, वैद्यकिय महाविद्यालयातले. पूर्ण धमाल.
शाहरूख खान आणि काजोल चा अभिनय की राज-सिमरन ची प्रेमकथा, इतर ही भरपूर काही. चित्रपटात काय आवडले ते नेमके सांगता येणार नाही. आणि असे म्हणतात की काही आवडले तर का आवडले ते शोधत बसू नये. त्याचा फक्त आनंद घ्यावा.
गाणी तर काय मस्त. एक एक शब्द. कथानकाला धरून. ही गाणी एवढी आवडली की कुठेही ऐकली, कोणत्याही कडव्यापासून किंवा मधल्या संगीतापासून. पुढील गाणे आपोआप गुणगुणणे सुरू होते. त्यावेळी तर जर कधी मूड खराब असला तर मी फक्त ह्या चित्रपटाची गाणी लावून ठेवायचो. मग थोडया वेळात मूड मस्त. अर्थात चित्रपटाचे संवाद आणि दृष्यही सर्व पाठ होते. एवढे की कधी जर सुरूवातीपासून सिनेमा डोळ्यांसमोर आला तर पूर्ण संपेपर्यंत एक एक दृष्य आठवणार.
आणखी एक आहे. ह्या चित्रपटानंतर काजोल मला आवडायला लागली. 'दिलवाले दुल्हनिया...' सर्वात आवडता सिनेमा आणि काजोल ही सर्वात आवडती अभिनेत्री. अजून तरी त्यात काही बदल नाही पडला.
सिनेमा पुन्हा पहावासा वाटतोय. पण सध्या उपलब्ध नाही. पाहिन ऑनलाईन आहे का? (पायरेटेड नाही. शिव्या नका घालू मला. राजश्री किंवा बिगफ्लिक्स वर. अधिकृत)
ह्या चित्रपटाबद्दल भरपूर लिहावेसे वाटते. पण नंतर कधीतरी...
आता पुन्हा तीच गाणी लावून ठेवतो. आणि हो, आता ह्या आठवड्यात परत भारतात येणार तर, 'घर आ जा परदेसी..' गाणे ही प्रसंगाला धरूनच आहे ;)