गूगल हे नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान आणि उत्पादने आणून लोकांना चकित करत असते आणि ते लोकांच्या फायद्याचेही असते. जसे की जीमेल, गूगल मॅप्स, अँड्रॉईड, ३६० डिग्री, जीपीएस वगैरे वगैरे.
आज गूगलने नवीन गोष्ट बाजारात आणली आहे. 'स्नूपाविजन' (SnoopaVision)
आज दुपारी यूट्यूबवर एक नवीन बटन दिसले. त्यावर टीचकी मारल्यावर कळले की 'स्नूपाविजन' हे यूट्यूबचे नवीन तंत्रज्ञान आहे ज्यात यूट्यूबवर असलेले सर्व व्हिडीयो ते ३६० डिग्री व्हिडीओ मध्ये रुपांतरीत करणार आहेत. (३६० डिग्री व्हिडीओ बद्दल विस्तृत माहिती लवकरच देतो येथे.)
ह्यातील मी नेहमी पाहत असलेली मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही रुपांतरीत व्हायला साल २०५१ पर्यत वाट पहावी लागेल.
गंमत वाटली ना? आणखी मोठी गंमत पुढे आहे. त्यांचा स्वत:चा व्हिडीयो रुपांतरीत व्हायला साल २१६५ उजाडावे लागेल.
अर्थात... काही खास नाही. हा एप्रिल फूल चा एक नमूना गूगलकडून.

0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा