कॅडबरी डेअरी मिल्क ची नवीन जाहिरात पाहिलीत?
बायको नवर्याला विचारते, "तू
मला शेवटचे 'आय लव यू' कधी म्हणालास?" तो उठून कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेट घेऊन येतो
आणि तिला देतो, "आता"....
ज्यांनी पाहिली
नसेल ते
येथे पाहू शकता.
सुंदर जाहिरात. मला आवडली. तसेच ती एक "खाने में क्या है?"
पण
त्यांनी ''आय लव यू' म्हणण्याकरीता नवीन प्रकार आणला असे नाही म्हणता येणार
;) महाविद्यालयीन वर्षांपासून हे माहित आहे.
ह्यावरूनच आमच्या महाविद्यालयीन
काळामधील साजरा केलेला Chocolate Day आठवला.
'चॉकलेट डे' साजरा करणार होते
तेव्हा ठरवले होते
Eclairs म्हणजे "You are my Good Friend"
Lacto king म्हणजे "I hate you"
आणि
Dairy Milk म्हणजे "I Love You"
मी तर कोणाला डेअरी मिल्क दिले नाही की मला मिळाले नाही. आणि लॅक्टोकिंग मिळावे
एवढा वाईट ही नसेन मी ;) (खरं काय असेल ना. तू मला आवडत नाहीस सांगण्याकरिता
चॉकलेटचा खर्च ही का करावा? :D )
पण माझ्या एका मित्राने गंमत केली, त्याने
लॅक्टोकिंग च्या कागदात एक्लेअर्स टाकून मुलांना/मुलींना दिले. त्याला काहींनी
विचारले, "काय रे, मी आवडत नाही का?" तो म्हणाला,"तसे नाही. आतील चॉकलेट पहा"
:)
असो ,मला ना डेअरी मिल्क मिळाले ना लॅक्टो किंग... पण एक्लेअर्स भरपूर मिळाले.