सारेगम, अंताक्षरी सारखे सुंदर कार्यक्रम कधी काळी चालू होते. (आधीचे आठवत नाहीत ;) )
नंतर आले इंडियन आयडॉल. इंडियन आयडॉलचा पहिला भाग थोडासा बघितला होता. चांगले गायक येत होते. नंतर अनु मलिक, फराह खान आणि सोनू निगम यांनी बहुतेक स्पर्धकांची खिल्ली उडविण्यास सुरूवात केली. तो प्रकार आवडला नाही. स्पर्धकांनीही परीक्षकांना सडेतोड उत्तरे दिलीत. ते चांगले वाटले. ;)
त्या पहिल्या कार्यक्रमात अभिजीत सावंत जिंकला. नंतर जास्त कधी दिसला नाही. त्याच धर्तीवर भरपूर कार्यक्रम सुरू झाले. स्पर्धक-परीक्षक, स्पर्धक-स्पर्धक, परीक्षक-परीक्षक वाद, भांडणं सुरू झाली. तरीही बहुधा चांगले कलाकार निवडले जाऊ लागले.
नंतर प्रेक्षकांना ह्यात सामील करून घेत त्यांच्याकडून पाठवलेल्या एस एम एस वरून विजेते निवडले जाऊ लागले. प्रकार आवडला नसला तरी आपली कला सर्वांसमोर आणण्याकरीता लोकांना एक मंच मिळाला. एक काय भरपूर मिळाले.
आता आलाय 'X Factor'. प्रकार तसाच... तोच Talent Hunt. सर्वच कार्यक्रमांप्रमाणे हा ही सुरूवातीला बरा वाटतोय. पुढे कसे चालते पाहू ;)
(चित्रं आंतरजालावरून साभार)
2 प्रतिक्रिया:
x फॅक्टर हा "सध्याचा" एक विनोदी(जास्त) + क्वचित प्रसंगी बऱ्या पैकी गायनाचा कार्यक्रम म्हणून मी ही पाहतो.मस्त असतो.वर्षा नु वर्षे टि.व्ही. समोर बसल्याने काही-काही कार्यक्रम हे कधी पहायचे ते आपोआपच ठरत जाते.उदाहरणार्थ रुडीज चे किंवा अगदी कोणत्याही इतर हिंदी इंग्रजी टॅलंट हंट प्रोग्रामचे अगदी सुरुवातीचे फक्त सिलेक्शनचे एपिसोडस. जाम धमाल असते.जे एक एक नमुने पहायला मिळतात ते कोणत्याही अगदी विनोदी सिरीयल मध्ये पण अनुभवायला मिळत नाही.त्यांचे रडणे-गागणे-भेकणे-चिडणे-बावरणे-अत्यानंदित होणे हे सर्व काही उस्फुर्त असते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांना कॅमेरा अवेअरनेस नसतो,नि त्या मुळे त्यांच्या सर्व काही रिएक्शन ह्या स्पॉनटेनियस असतात.त्या मुळे जो पर्यंत त्यांचे सिलेक्शन चालू आहे तो पर्यंत तर हा नियमित बघणारच.
:)
त्या मुळे जो पर्यंत त्यांचे सिलेक्शन चालू आहे तो पर्यंत तर हा नियमित बघणारच
हो... बहुधा मी ही पहिल्या निवडी होत पर्यंत पाहीन. नंतर सांगता येत नाही.
टिप्पणी पोस्ट करा