कॅडबरी डेअरी मिल्क ची नवीन जाहिरात पाहिलीत?
बायको नवर्याला विचारते, "तू मला शेवटचे 'आय लव यू' कधी म्हणालास?" तो उठून कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेट घेऊन येतो आणि तिला देतो, "आता"....
ज्यांनी पाहिली नसेल ते येथे पाहू शकता.
सुंदर जाहिरात. मला आवडली. तसेच ती एक "खाने में क्या है?"
पण त्यांनी ''आय लव यू' म्हणण्याकरीता नवीन प्रकार आणला असे नाही म्हणता येणार ;) महाविद्यालयीन वर्षांपासून हे माहित आहे.
ह्यावरूनच आमच्या महाविद्यालयीन काळामधील साजरा केलेला Chocolate Day आठवला.
'चॉकलेट डे' साजरा करणार होते तेव्हा ठरवले होते
Eclairs म्हणजे "You are my Good Friend"
Lacto king म्हणजे "I hate you"
आणि
Dairy Milk म्हणजे "I Love You"
मी तर कोणाला डेअरी मिल्क दिले नाही की मला मिळाले नाही. आणि लॅक्टोकिंग मिळावे एवढा वाईट ही नसेन मी ;) (खरं काय असेल ना. तू मला आवडत नाहीस सांगण्याकरिता चॉकलेटचा खर्च ही का करावा? :D )
पण माझ्या एका मित्राने गंमत केली, त्याने लॅक्टोकिंग च्या कागदात एक्लेअर्स टाकून मुलांना/मुलींना दिले. त्याला काहींनी विचारले, "काय रे, मी आवडत नाही का?" तो म्हणाला,"तसे नाही. आतील चॉकलेट पहा" :)
असो ,मला ना डेअरी मिल्क मिळाले ना लॅक्टो किंग... पण एक्लेअर्स भरपूर मिळाले.
4 प्रतिक्रिया:
पण त्यांनी ''आय लव यू' म्हणण्याकरीता नवीन प्रकार आणला असे नाही म्हणता येणार ;)
अरे अस कस ... तो मेला रोज देतोय... अशाने फ्रीज भरून ठेवावा लागेल ... आपण आपल एकदाच देण्या घेण्याचा प्रयत्न केला असेल...
"असो ,मला ना डेअरी मिल्क मिळाले ना लॅक्टो किंग... पण एक्लेअर्स भरपूर मिळाले."
देवदत्त, आहे ब्बुवा....आम्ही कधी आपल्या साध्या बडीशेपेच्या गोळ्या पर्यंत पण नाही पोहोचलो यार...अन आता तर काय आमच्यातल्या काहींची तर पार प्रिस्क्रिप्शन मधल्या गोळ्या पर्यंत मजल गेलीये :) त्या मुळे नुसत्या जाहिरातीच बघायाच्या :)नि....असो...नुसत्या गोळ्या झाडायचं थांबवतो..पण ते काही असो ....हि जाहिरात मस्तच आहे नि कल्पना सामान्य दिसते पण त्यातच तिचे असामान्यत्व दडले आहे.आणि मीठे में क्या है ? तर फारच अफलातून... सुंदर.
Abhishek,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
दररोज देण्याच्या अर्थाने नाही म्हणालो मी. पण हो, तो नवीन प्रकार सुरु केला असे म्हणता येईल.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद mynac.
जाहिरात खरोखरच मस्त वाटली.
फेविकॉल , एअरटेल आणि आता डेअरी मिल्क च्या जाहिराती जास्त आवडतात. आणि त्या आपला दर्जा टिकवून राहतील ही अपेक्षा.
टिप्पणी पोस्ट करा