गेले काही वर्षे सुट्ट्या पैशांची अडचण पाहण्यात येते आहे. अर्थात ती खरी असेलही, पण कितपत त्याचा अंदाज नाही.
काही वर्षांपूर्वी चार आण्यांची नाणी दुकानदारांनी घेणे/देणे स्वतःहून बंद केले होते. बसमध्येही वाहक प्रवाशांच्या नावाने शंख करतात की सुट्टे पैसे द्या म्हणून. पण त्यावेळी बेस्टचे वाहक ती नाणी नाकारत नव्हते. नंतर रिझर्व बँकेने २५ पैशांची नाणी अधिकृतरित्या चलनातून बंद केली आणि त्यांनी सांगितले की सर्व किंमती ५० पैशांच्या गुणांकात असावीत. पण तरीही अजूनही भरपूर गोष्टींच्या किंमती इतर पैशांमध्ये दर्शविलेल्या असतात. ह्यामुळे २५ रू. ३५ पैशाची गोष्ट २५.०० रूपये किंवा २६.०० रुपयांना विकली जाते. काही लोक रू. २५.५० ही घेत असतील. ह्यात नफा तोटा सोडून देऊ. जास्त कोणी लक्ष देत नाही. मूळ किंमतीवर विविध टक्केवारीत विविध प्रकारचे कर लागून एकूण किंमत ५० पैशांशिवाय इतर पैशांत येत असेल. असो.
भरपूर दुकानांत तर किंमतीचा आकडा सोपा करण्यासाठी दुकानदार देय किंमतीतून कराच्या टक्क्यांनी एखाद्या गोष्टीची मूळ किंमत आणि कर असे विभाजन करतात, आणि पावतीत लिहितात. हे ही ठीक आहे. ते होते अर्थात मोठ्या रकमेच्या गोष्टींसाठी.
पण एक प्रकार सुरू झाला आहे तो म्हणजे, ५० पैसे किंवा १ रू. परत द्यायच्या ऐवजी चॉकलेट, गोळ्या देणे. हा प्रकार तर एवढा वाढला आहे की काही हॉटेल, दुकानांत तर सुट्ट्या १ ते ५ रूपयांऐवजी चॉकलेट देतात आणि कारण सांगतात की सुट्टे नाहीत. मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण १-२ रूपयांऐवजी चॉकलेट दिले तर तुम्ही घ्याल का? आम्हालाही तर सुट्ट्या पैशांची अडचण होत असते. :)
असेच वेगळे मागणीदार म्हणजे रिक्षा/टॅक्सी चालक. त्यांच्याकडेही हीच अडचण असते. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे ती खरी असतेही, पण कितपत तो एक मुद्दा आहे.
ह्या सर्वांवर शक्कल वापरून आता एअरटेल ने नवीन जाहिराती काढल्या आहेत. सुट्टा एक रूपया देण्याऐवजी मोबाईलवर व्हिडीओ/गाणी दाखवणे.
ती ग्राहकाच्या फायद्याची की दुकानदार/रिक्षा चालकांच्या, ते माहित नाही. मोबाईल कंपनीच्या फायद्याची नक्कीच.
पण दुकानदारांनी खरोखरच ही गोष्ट वापरात आणली नाही म्हणजे खूप झाले. ;)

0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा