साधारणतः उत्पन्नावर मिळणारी करातील वजावट ही दोन प्रकारे
असते.
१. पगारात दिलेले विशिष्ट भत्ते : वेगवेगळ्या कंपनी आपल्या नियमांनुसार, सोयीनुसार कर्मचार्यांना काही प्रकारचे भत्ते देत असतात. त्यातील काही भत्त्यांवर प्राप्तीकर नियमांनुसार थेट वजावट मिळते. पण ह्यातही कर्मचार्याने तो भत्ता त्या कारणाकरीता वापरला आहे ह्याचे पुरावे द्यावे लागतात.
उदा.
२. गुंतविलेल्या रक्कमेवर कर वजावट: एखाद्याने उत्पन्नातील काही रक्कम ठराविक प्रकारच्या साधनांमध्ये गुंतविल्यास त्या रकमेवर पूर्ण (किंवा ठराविक टक्क्यांनी) वजावट
उदा.
ह्याचप्रकारे गुंतविलेल्या रक्कमेवर, आणि त्या गुंतवणूकीवर मिळणारे उत्पन्न ह्यावर कर सूट ही तीन प्रकारांत विभागलेली आहे.
बहुतेक वेळा तुम्ही EEE(Exempt-Exempt-Exempt) किंवा EET(Exempt-Exempt-Tax) हे शब्दप्रकार ऐकले असतील. ते ह्याच सवलतीबद्दल आहेत.
१. गुंतविलेल्या रक्कमेवर कर वजावट आहे की नाही. (पहिला E/T)
२. त्या गुंतवणूकीवर मिळणारे व्याज, किंवा इतर उत्पन्न ह्यावरील कर सूट (दुसरा E/T)
३. त्या गुंतवणूकीतील पैसे पूर्ण काढल्यावर (मध्येच बंद करून किंवा मुदत संपल्यावर) मिळणार्या रक्कमेवरील कर सूट (तिसरा E/T)
आपण करत असलेल्या गुंतवणूकी मुख्यत्वे खालील प्रकारात येतात
Exempt-Tax-Tax
Exempt-Exempt-Tax
Exempt-Exempt-Exempt
आणि
Tax-Exempt-Exempt (प्रथमतः गुंतवणूकीवर कर सवलत नसल्याने पुढील नफा करमुक्त असण्याची शक्यता कमी दिसते, पण त्याचीही काही उदाहरणे आपण पुढील भागांत पाहू)
(क्रमशः)

- घरभाडे भत्ता - घर भाड्याची पावती आणि/किंवा भाडे करारनामा (Rent Agreement) सादर करावे लागते.
- रजेच्या काळातील प्रवास भत्ता - केलेल्या प्रवासाची तिकिटे सादर केल्यानंतरच ह्या भत्त्यावर वजावट मिळते.
२. गुंतविलेल्या रक्कमेवर कर वजावट: एखाद्याने उत्पन्नातील काही रक्कम ठराविक प्रकारच्या साधनांमध्ये गुंतविल्यास त्या रकमेवर पूर्ण (किंवा ठराविक टक्क्यांनी) वजावट
उदा.
- जीवन विम्याकरीता भरलेल्या हप्त्यावर मिळणारी वजावट
- ५ वर्षांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतविलेल्या रक्कमेवर मिळणारी वजावट.
ह्याचप्रकारे गुंतविलेल्या रक्कमेवर, आणि त्या गुंतवणूकीवर मिळणारे उत्पन्न ह्यावर कर सूट ही तीन प्रकारांत विभागलेली आहे.
बहुतेक वेळा तुम्ही EEE(Exempt-Exempt-Exempt) किंवा EET(Exempt-Exempt-Tax) हे शब्दप्रकार ऐकले असतील. ते ह्याच सवलतीबद्दल आहेत.
१. गुंतविलेल्या रक्कमेवर कर वजावट आहे की नाही. (पहिला E/T)
२. त्या गुंतवणूकीवर मिळणारे व्याज, किंवा इतर उत्पन्न ह्यावरील कर सूट (दुसरा E/T)
३. त्या गुंतवणूकीतील पैसे पूर्ण काढल्यावर (मध्येच बंद करून किंवा मुदत संपल्यावर) मिळणार्या रक्कमेवरील कर सूट (तिसरा E/T)
आपण करत असलेल्या गुंतवणूकी मुख्यत्वे खालील प्रकारात येतात
Exempt-Tax-Tax
Exempt-Exempt-Tax
Exempt-Exempt-Exempt
आणि
Tax-Exempt-Exempt (प्रथमतः गुंतवणूकीवर कर सवलत नसल्याने पुढील नफा करमुक्त असण्याची शक्यता कमी दिसते, पण त्याचीही काही उदाहरणे आपण पुढील भागांत पाहू)
(क्रमशः)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा