आत्तापर्यंत आपण कर मर्यादा,
भत्त्यांवरील करसवलत ह्याबद्दल पाहिले. ह्यापुढे आपण गुंतवणूकीचे पर्याय आणि
त्यांची कर संरचना ह्याबद्दल पाहूया.
भविष्य निर्वाह निधी (Provident Fund - PF)
सरकारी नियमानुसार दरमहा मूळ पगाराच्या (आणि महागाई भत्ता) १२% रक्कम कर्मचारी आणि त्याची मालक आस्थापना दोघांकडून कर्मचार्याच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ खात्यात जमा केली जाते. ह्यातील मालक आस्थापनेकडून जमा रक्कम कर्मचार्याच्या पगारात धरली जात नसल्याने त्यात कर संरचनेचा प्रभाव पडत नाही, किंवा ती प्राप्ती करमुक्त असते. कर्मचार्याच्या पगारातून कापलेली रक्कम कलम 80C नुसार करसवलतीस पात्र असते. त्यामुळे सर्वाधिक सोप्या आणि लोकप्रिय असलेल्या कलम 80C मधील गुंतवणूकीबद्दल पर्याय शोधताना, आधी पीएफ ची रक्कम त्यातून वजा करावी व उरलेली मर्यादा इतर पर्यायांकरीता वापरावी.
मर्यादा:
नोकरीतून निवृत्तीपर्यंत.
गुंतवणूकीवर कर सवलत:
स्वेच्छा भविष्य निर्वाह निधी (Voluntary Provident Fund - VPF)
नियमांनुसार कर्मचारी आणि त्याचे मालक ह्यांना कर्मचार्याच्या भविष्य निर्वाह निधीत १२% रक्कम जमा करावी लागते. परंतु कर्मचार्याची इच्छा असल्यास तो ह्याहून अधिक रक्कम भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करू शकतो. त्यास स्वेच्छा भविष्य निर्वाह निधी ( Voluntary Provident Fund - VPF) असे म्हणतात. VPF मध्ये गुंतवणूकीस कर्मचार्याचा मालक बांधिल नाही. त्यामुळे ह्यात फक्त कर्मचार्याच्या पगारातूनच निधी कापला जातो.
VPF चे इतर नियम PF सारखेच आहेत. फक्त ह्याची कमाल मर्यादा कर्मचार्याच्या मूळ पगाराच्या १००% पर्यंत एवढीच आहे. (पण १२% आधीच PF मध्ये असल्याने ८८%)
____________________________________________________________________________
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund - PPF)
भविष्य निर्वाह निधीत (PF) सर्वच व्यक्तींना पैसे गुंतविता येत नसले तरी अशीच सुविधा सर्वांकरीता 'सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी'द्वारे सरकारने उपलब्ध करून दिली आहे. ठराविक राष्ट्रीयीकृत बँकांच्या निवडक शाखांत आणि ठराविक खाजगी बँकांत किंवा ठराविक टपाल कार्यालयात एखाद्या व्यक्तीस सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडता येते. प्रत्येकी एकच खाते उघडण्याची परवानगी मिळते.
मर्यादा:
१५ वर्षे. त्यानंतर ५ -५ वर्षांकरीता मुदत वाढवू शकतो. पहिली १५ वर्षे किंवा मुदत वाढ घेतल्यास त्या मुदतीत खाते बंद करता येत नाही. परंतु ७व्या वर्षापासून वर्षात एकदा काही रक्कम काढता येते.

- फक्त नोकरीतून पगार मिळत असलेल्या कर्मचार्यांकरीता. व्यवसाय करणार्यांकरीता ह्याचा फायदा नाही.
- महिन्याला (मूळ पगार + महागाई भत्ता)च्या १२% रक्कम.
- कलम 80C नुसार करसवलत. त्यामुळे वार्षिक कमाल रू. १,००,०००/- एवढी रक्कम करसवलतीस पात्र.
नोकरीतून निवृत्तीपर्यंत.
गुंतवणूकीवर कर सवलत:
- ह्यात गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस पात्र.
- मिळणारे व्याज पुन्हा गुंतविले जात असते. ह्यावर कर लागू होत नाही.
- मुदतपूर्व रक्कम काढल्यास कर लागत नाही, पण कमीत कमी ५ वर्षे ते खाते सुरू असले पाहिजे. दुसर्या शब्दांत, एखाद्या कंपनीत कमीत कमी ५ वर्षे नोकरी केली असल्यास, नंतर जर पीएफ खात्यातून रक्कम काढल्यास त्यावर कर लागत नाही. ५ वर्षांआधी काढल्यास कर भरावा लागतो.
- मुदतीनंतर काढलेली संपूर्ण रक्कम (व्याजासहीत) करमुक्त असते.
स्वेच्छा भविष्य निर्वाह निधी (Voluntary Provident Fund - VPF)
नियमांनुसार कर्मचारी आणि त्याचे मालक ह्यांना कर्मचार्याच्या भविष्य निर्वाह निधीत १२% रक्कम जमा करावी लागते. परंतु कर्मचार्याची इच्छा असल्यास तो ह्याहून अधिक रक्कम भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करू शकतो. त्यास स्वेच्छा भविष्य निर्वाह निधी ( Voluntary Provident Fund - VPF) असे म्हणतात. VPF मध्ये गुंतवणूकीस कर्मचार्याचा मालक बांधिल नाही. त्यामुळे ह्यात फक्त कर्मचार्याच्या पगारातूनच निधी कापला जातो.
VPF चे इतर नियम PF सारखेच आहेत. फक्त ह्याची कमाल मर्यादा कर्मचार्याच्या मूळ पगाराच्या १००% पर्यंत एवढीच आहे. (पण १२% आधीच PF मध्ये असल्याने ८८%)
____________________________________________________________________________
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund - PPF)
भविष्य निर्वाह निधीत (PF) सर्वच व्यक्तींना पैसे गुंतविता येत नसले तरी अशीच सुविधा सर्वांकरीता 'सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी'द्वारे सरकारने उपलब्ध करून दिली आहे. ठराविक राष्ट्रीयीकृत बँकांच्या निवडक शाखांत आणि ठराविक खाजगी बँकांत किंवा ठराविक टपाल कार्यालयात एखाद्या व्यक्तीस सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडता येते. प्रत्येकी एकच खाते उघडण्याची परवानगी मिळते.
मर्यादा:
- प्रत्येक आर्थिक वर्षात किमान रू. ५००/- भरून खाते सुरू ठेवावे लागते.
- प्रत्येक आर्थिक वर्षात कमाल १२ वेळा पैसे भरता येतात.
- प्रत्येक व्यक्तीला कमाल एकच खाते उघडता येते. परंतु गरज पडल्यास ते दुसर्या शाखेत किंवा बँकेत स्थानांतरीत करू शकतो. पण स्वत:च्या अज्ञान मुलांच्या नावाने अतिरिक्त खाते उघडण्यास परवानगी आहे.
१५ वर्षे. त्यानंतर ५ -५ वर्षांकरीता मुदत वाढवू शकतो. पहिली १५ वर्षे किंवा मुदत वाढ घेतल्यास त्या मुदतीत खाते बंद करता येत नाही. परंतु ७व्या वर्षापासून वर्षात एकदा काही रक्कम काढता येते.
गुंतवणूकीवर कर सवलत:
- ह्यात गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस पात्र. ह्यात स्वत:चे खाते आणि मुलांची खाती असल्यास ती सर्व अशी सर्वांची एकूण रक्कम धरली जाते.
- मिळणारे व्याज पुन्हा गुंतविले जात असते. ह्यावर कर लागू होत नाही.
- मुदतीनंतर काढलेली संपूर्ण रक्कम (व्याजासहीत) करमुक्त असते.
इतर मुद्दे:
- PPF मध्ये रक्कम जमा करताना शक्य असल्यास महिन्याच्या ५ तारखेच्या आधी जमा करावेत. कारण, महिन्याची ५ तारीख किंवा शेवटची तारीख ह्यात जी शिल्लक कमी असते त्यावर व्याज मोजले जाते.
- जरी एखाद्या व्यक्तीने वार्षिक ५०,००० किंवा इतर मोठी रक्कमही खात्यात भरायचे ठरविले असेल, परंतु काही कारणांनी ते जमले नाही, तरी निदान ५०० रू. प्रत्येक खात्यात जमा करावे, जेणेकरून त्या खात्यावरील सुविधा बंद होणार नाहीत.
अद्यतन(३०/०५/१३): भविष्य निर्वाह निधीचे १२% हे मूळ पगार आणि महागाई भत्ता ह्यांची एकूण
बेरजेचे असतात.
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा