नवी मुंबईमध्ये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात आल्याची बातमी काल रात्री वाचली.
चांगला उपक्रम. अर्थात त्यामागील कारणामुळे. राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी.
पण आम्हाला एक प्रश्न पडतो आणि सुचवावेसे वाटते की असे नियम सणासुदींच्या, दिनांच्या २/३ दिवस आधीच का आणले जातात? ते आधीच का नाही कार्यान्वित करत? आता त्या झेंड्यांच्या उत्पादकांनी झेंडे वितरकांना देऊन दुकाना-दुकानातून आणि रस्त्यांवरून विकले गेलेही असतील आणि आज उद्याही विकले जातील. विक्रेता म्हणेल मी आत्ता हे झेंडे न विकून माझे नुकसान का करून घेऊ? वितरक आणि उत्पादक ही तेच म्हणतील.
अशीच गोष्ट गणेश मूर्तींबाबतही. पर्यावरणाच्या रक्षणाकरीता प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षा शाडू मातीच्या मूर्ती बनवाव्यात असे आवाहन आणि नियमही गणेशोत्सवाच्या १० दिवस आधीपासून लोकांपर्यंत येतील. पण जर अशा मूर्ती ३-३ महिने आधीपासून बनविल्या जातात तर तेव्हाच असे आवाहन का केले जात नाही? तेव्हाही विक्रेता हेच म्हणेल मी आत्ता ही मूर्ती न विकून माझे नुकसान का करून घेऊ?

5 प्रतिक्रिया:
आमची सरकारं नेहमीच तहान लागल्यावर विहिरी खणतात, भुक्या नंग्यांचा विचार करायला हे काय स्वराज्य आहे का?
Dev, continue uploading social issues/news on your blog!!
टिप्पणी पोस्ट करा