आज गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव.
दहीहंडी फोडणार्या गोविंदांवर पाणी ओतण्याची प्रथा वर्षांपासून चालत आहे. पण गेले काही वर्षे तर पाण्याचे टँकर मागवून त्यातून ह्या लोकांवर पाणी टाकणे अशी नवीन प्रथा मोठ्या लोकांनी सुरू केली. हा जरा विचित्रच प्रकार. कित्येक गावांत लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि इथे अशा प्रकारे पाणी वाया घालविले जाते हे पटतच नाही. तरी ह्यावर्षी मुंबईमधील पथके ह्याबाबत जनजागृती करत 'पाणी वाया घालवू नका' असा संदेश देत आहेत असे वाचले (दुवा येथे पहा). चांगले आहे. असेच लोकांनी सर्वत्र करावे अशी मागणी आणि आशा.
अर्थात जर पाऊस पडत असेल तर अशा प्रकारे वाया जाणारे पाणी वाचवता येईलच. पण पाऊसच जास्त पडत नाही मग लोकांना असले मार्ग सुचतात. तरी आता कार्यालयात शिरता शिरता जोरात पाऊस पडणार असल्याची लक्षणे आकाशात दिसली. ५ मिनिटे जोरात पाऊसही पडला. आजच्या दिवस तरी भरपूर पाऊस पडो अशी अपेक्षा.

2 प्रतिक्रिया:
१००% सहमत !
धन्यवाद हेरंब.
दहीहंडीबाबत अजूनही काही लिहायचे होते, पण टाळले.
टिप्पणी पोस्ट करा