२ आठवड्यांपूर्वी म्हटल्याप्रमाणे मी DND बद्दल वैतागलो होतो. ते संदेश ही आणि ग्राहक सेवा केंद्रातील लोकांची उत्तरे ऐकूनही. त्याचीच तक्रार शेवटी मोबाईल ग्राहक सेवा केंद्राच्या वरच्या पातळीवरील कार्यालयात केली. ग्राहक सेवा केंद्राने माझ्या विपत्राला उत्तर दिले नाही असेही त्यात म्हटले होते.
लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांनीच संपर्क केला व सांगितले की ग्राहक सेवा केंद्रातून मिळालेल्या चुकीच्या उत्तरांबद्दल ते दिलगीर आहेत. तसेच तक्रार करण्याचा कालावधी ६ तास किंवा ३ दिवस नसून १५ दिवस आहे. आणि त्यांनी पुन्हा ते संदेश आणि क्रमांक त्यांच्याकडे पाठविण्यास सांगितले आहे.
चला, निदान काहीतरी उत्तर मिळाले.
पण मुख्य प्रश्न पुन्हा तसाच राहतो. ते संदेश पाठवणार्यांचे काय? तो त्रास खरोखर बंद होईल का? शक्यता कमीच वाटते ;)

2 प्रतिक्रिया:
I really doubt so. I have got my two numbers and both are registered in DND. But somehow, I still get these marketing messages. Especially from "Dr.Batra" :)
मताशी सहमत आहे श्रीनिवास.
म्हणूनच मी ही शक्यता कमीच वाटते असेच लिहिले होते :)
त्या डॉ बत्रा ला स्वत:चेच लघुसंदेश सारखे सारखे पाठवले जायला पाहिजेत ;)
टिप्पणी पोस्ट करा