आज चुकून राजू परूळेकरांचे २२ एप्रिलचे 'डी'टॉक्स वाचले. चुकूनच... कारण गेले कित्येक महिने मी लोकप्रभामध्ये फक्त मेतकूट हे सदरच वाचतोय. इतर एखाद दुसरा वाचा असे कोणी सांगितले तर. :)
ह्म्म तर म्हणत होतो, डीटॉक्स बद्दल. क्रिकेट: एक सोशियो पोलिटिकल अॅनेस्थेशिया. नाही घाबरू नका. इथे मी क्रिकेटबद्दल काही लिहिणार नाही आहे.
राजू परूळेकरांनी पुन्हा ग्लॅडियेटर आणि क्रिकेट ह्यांच्यातील साम्याबद्दल थोडेसे लिहिले आहे. पूर्ण लेख वाचता वाचता मला त्यांचे सचिन (ग्लॅडियेटर) तेंडुलकर हे लेखन आठवले.
आजही जवळपास दीड वर्षांनी त्याच विषयावर लेखन केले तेच लेखन पण वेगळी पात्रे घेऊन.
हेच जर त्यांनी नोव्हें. २००९ मध्ये लिहिले असते तर उगाच त्याचे स्पष्टीकरण द्यायला दुसरा लेख लिहावा लागला नसता, आणि आम्हीही इतर काही लिहिले असते. :)
माझे संबंधित लेखन:
...तरी सचिनने बिघडवले काय?
पुन्हा अल्केमिस्ट्री
1 प्रतिक्रिया:
ह्म्म्म interesting!
टिप्पणी पोस्ट करा