जगभरात विविध दिन साजरे करायची फॅशन आली आहे. फक्त काही दिन थोडे महत्त्वाचे वाटतात उदा. जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन(World Anti Tobacco Day ), वसुंधरा दिन .. अरे हो तो वसुंधरा तास आहे ना? ( World Earth Hour), तत्सम आणि उद्या असलेला जागतिक पर्यावरण दिन.
आता थोड्या वेळापूर्वी एक विपत्र आले. उद्याच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझे कार्बन फुटप्रिंट (Carbon Footprint) मोजण्याबाबत. म्हटले चला पाहूया मोजून काय, कसे असते ते. कार्बन फुटप्रिंट बाबत माहिती शोधायचा प्रयत्न केला पण ते जरा विस्तारीत रूपातच मिळाले. थोडक्यात असेच की आपण किती कार्बन पर्यावरणात सोडतो.
ह्म्म, तर त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन त्यांनी मागितलेली माहिती पुरविली. ती अशाप्रकारे.. .
- क्षेत्र (भारतातील राज्य),
- घरातील सदस्य
- एल पी जी वापर (सिलेंडर/महिना)
- वीजवापर (kwh/महिना)
- नैसर्गिक वायू वापर (m3/महिना)
प्रवासः
- रिक्षा (किमी/दिन)
- बस (किमी/दिन)
- खाजगी चारचाकी वाहन (किमी/दिन)
- खाजगी दुचाकी वाहन (किमी/दिन)
- टॅक्सी (किमी/दिन)
- ट्रेन (किमी/महिना)
- विमान (किमी/वर्ष)
जर मी दुचाकी ऐवजी बसचा वापर केला तर कार्बन पायखुणा
निदान बहुधा पुढचे तीन महिने तरी हे कमी असेल ;)
तुम्ही कधी तुमचे कार्बन फुटप्रिंट मोजले आहेत? ते कमी करण्याकरीता काय उपाय केलेत?
1 प्रतिक्रिया:
अरे सही, मस्त माहिती आहे!
टिप्पणी पोस्ट करा