छ्या... गप्प रहायचे म्हटले तर हेच लोक छळतात.
सरकारने DND अर्थात Do Not Disturb ची सुविधा सुरु केली तेव्हा ग्राहकांना बरे वाटले होते. चला आता ह्या जाचातून सुटका. पण कॉल कमी झाले तरी संदेश येतच असतात.
आज स्पॅम मेसेज बद्दल तक्रार करायची होती.. गेल्या शनिवारीही एका संदेशाची तक्रार केली होती. ग्राहक सेवा केंद्राच्या माणासाने विचारले, "कधी आला होता संदेश? " तो संदेश आला होता त्याच्या १० दिवस आधी. तर तो म्हणतो ३ दिवसांच्या आत तक्रार करायची असते. काल एक संदेश आला त्याची आज तक्रार केली तर आता म्हणतात, 'तुम्ही ६ तासांच्या आत तक्रार करायची'.
कैच्याकै.
मी म्हटले, "पुढील वेळी मी जर १५ मिनिटांत तक्रार केली तर तुम्ही म्हणाल ' अरेरे, तो कॉल/संदेश तेव्हाच ट्रान्स्फर करायला पाहिजे होता तुम्ही' ".
आता शनिवारी पुन्हा त्यांच्या समोर जाऊनच तक्रार करावी लागेल :)
(चित्र आंतरजालावरून साभार)

3 प्रतिक्रिया:
कस्टमर केअर उर्फ 'ग्राहक छळवाद केंद्र' ह्या माझ्या लेखात या लोकांच्या छळवादाचे आणखी किस्से वाचू शकाल.
आगळं! वेगळं!!!
http://nathtel.blogspot.com/2011/03/blog-post_17.html
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद रमण कारंजकर.
तुमच्या ह्या लिखाणाबद्दल बहुधा ओझरते वाचले होते. आता पूर्ण नीट वाचून प्रतिक्रिया देईन तिथेही :)
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद विक्रांत.
हो हे अशाप्रकारे वरच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करावीच लागेल बहुधा. आधी ही एक दोन वेळा वर तक्रार केली तर कामे झाली होती, पण ती माझ्या खात्याबद्दल आणि सेवेतील काही अडचणींबद्दल होती.
DND ची अडचण राष्ट्रव्यापी ;) आणि सर्व सेवा देणाऱ्यांशी निगडीत आहे, त्यामुळे पूर्ण निकालात निघणे कठीणच.
शुक्रवार ३ जून २०११ १०-५६-०० pm IST
टिप्पणी पोस्ट करा