आपल्यात एक म्हण आहे, 'जिस थाली में खाया उसी में छेद किया'
किंवा 'नमक हराम', किंवा 'खाल्ल्या मिठाला जागणे' वगैरे वगैरे.
पण उंदरांकरीता ही म्हण/वाक्प्रचार वापरताच येणार नाही. त्यांना कुठे माहित असणार हे सर्व. अर्थात त्यांनी नेमके घरातील मीठ खाल्ले नाही. पण कारच्या खाली त्यांना जागा मिळाली न भिजण्याकरीता, किंवा कारच्या इंजिनाजवळ मिळाला तात्पुरता निवारा तर नीट राहायचे ना...
तिथल्या तारा कुरतडून तोडून टाकल्या.
नेमके पावसाळ्यात वायपर नाही चालले तर कसे होईल? लवकरात लवकर पुन्हा ते ठीक करून घ्यावे लागेल. पण किती वेळा दुरूस्ती करणार? आता हे तिसर्यांदा होत आहे दोन महिन्यांत.
सल्ले मिळाले, "तंबाखूच्या पुड्या ठेवा". पण किती, कुठे कुठे? आणखी काही उपाय आहेत का?
2 प्रतिक्रिया:
मांजर पाळा आणि रोज कारखाली तिच्यासाठी दुधाची वाटी ठेवत चला. उंदीर खाल्ल्याने (मांजरीच्या) घशात जळजळते म्हणे. त्यावर उतारा म्हणून दूध. :-)
हा हा हा
तृप्ती, नंतर त्या मांजराकरिता असंच काहीतरी नवीन लिहून पुन्हा सल्ले मागावे लागतील मला. :)
टिप्पणी पोस्ट करा