भविष्य : भारत वर्ल्डकप जिंकणार!
चढतोय वर्ल्डकप फीवरचा पारा
भारत-पाकिस्तान उपांत्य सामन्याच्या निमित्ताने संपूर्ण देश क्रिकेटमय झाला असून देशातील बहुतांश कंपन्यांमध्ये बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विविध राजकीय विचारधारांमध्ये गुरफटलेले मध्य प्रदेश विधानसभेतील आमदार सोमवारी आपापसातील मतभेद विसरून एका मागणीसाठी खांद्याला खांदा लावून सरसावले. त्यांच्या या मागणीपुढे विधानसभा अध्यक्षांनाही नमते घ्यावे लागले. ही मागणी होती, बुधवारी, ३० मार्च रोजी विधानसभेचे कामकाज अर्ध्या दिवसानंतर बंद ठेवण्याची.
सामना :
मॅच बघण्यासाठी आमदारांना हवी अर्धा दिवस सुट्टी
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना सर्व आमदारांना पाहायला मिळावा म्हणून विधिमंडळाचे त्या दिवशीचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत संपविण्यात यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज केली. संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांची ही मागणी सरकारला मिळाली आहे, असा दुजोरा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना हवेत क्रिकेट पास
विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यात मग आपले महाराष्ट्रातले नेते तरी मागे का राहातील. म्हणूनच, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांनी हा सामना पाहण्यासाठी सरकारकडे पासची मागणी केली आहे.
येत्या बुधवारी मुंबई बंद!
क्रिकेटसाठी ऑपरेशन पुढे ढकलले
हे तर नमुन्यादाखल काही आहे. मी पाहिलेल्या वृत्त संकेतस्थळांवरील भातातील एक शित.
स्टार माझा वर एक बातमी दाखवत होते त्यात सर्व खेळाडूंना देवांच्या तसबिरीत बसविले आहे. त्यांच्या चित्राचे पूजन करत असतील तरी जास्तच वाटते. पण इथे तर हिंदू देवतांच्या प्रतिमेतील चेहऱ्यात त्यांचे चेहरे बसवले होते.
इथे त्या तथाकथित देव मानणाऱ्या लोकांना राग येत नाही?
गेल्या वेळी २ एकदम विरुद्ध छायाचित्रे एकत्र ओर्कुट वर पाहिली होती. एकात भारतीय क्रिकेट खेळाडूंची पूजा करत आहेत. बाजूच्याच छायाचित्रात भारत सामन्यात हरल्यामुळे खेळाडूंच्या घरावर दगडफेक की काळे फासत असल्याचे. आता शोधूनही मिळाली नाहीत ती चित्रे.
अति होतंय आता. क्रिकेट मलाही आवडायचं. पण ह्याच अतिरेकामुळे ते नावडते झाले आहे.
2 प्रतिक्रिया:
सोपं उदाहरण.. १० वर्षांपूर्वी मराठी ब्लॉग्ज नव्हते. २ वर्षांपूर्वी शेकड्यात होते. आता हजारात आहेत. अतिरेक होतोय म्हणून ब्लॉगिंग सोडशील का? आपण आपल्या आवडत्या गोष्टी अतिरेक वगळून कराव्यात. संपलं :)
थोडा फरक आहे त्यात हेरंब.
इथे इतर महत्वाची कामे सोडून क्रिकेटला महत्व देणे हे आले. वेळ आणि पैश्यांचा अपव्यय आमच्या मते त्यात जास्त होत चाललंय.
आणि सुरुवातीला मी ते दुर्लक्षिलेच होते. पण जेव्हा त्याचा आपल्यावर भडीमार होतो तसेच आपल्याला फरक पडायला लागतो तेव्हा मग ते नकोसे होते.
असो, आवडणारे त्याबाजूने आणि दुसरे वेगळे बोलणार हे ही आलेच.
किमान आता तरी तुम्ही सामन्याची मजा घ्या मी इतर गोष्टींची ;)
टिप्पणी पोस्ट करा