रेल्वेत मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यास बंदी
आज ही बातमी वाचली. लगेच मनात विचार आला, उपनगरी गाड्यांमध्ये जे भिकारी मोठमोठ्याने गाणे ओरडत असतात (ओरडतच हो, नीट थोडी असतात. एखादाच क्वचित) त्यांच्यावरही हा नियम लागू करतील का? ह्या सर्व गोष्टी आपल्याकरीताच असतात.
ह्यावरूनच ५/६ वर्षांपुर्वीचा प्रसंग आठवला. दादर-ठाणे प्रवास दुसर्या वर्गातून करत होतो. एक ८/१० वर्षांचा मुलगा आला, गाणं ओरडत आणि हात पसरून. लोक बोलत होते, "काय रे हा वैताग?" असे नेहमीच म्हणतात. त्या दिवशी मी ही जास्तच वैतागलेलो होतो. उठलो आणि त्या मुलाला रागावून सांगितले, "इथे आवाज बंद पाहिजे". तो भांबावून गप्प झाला. नंतर दुसर्या दरवाज्यात जाऊन पुन्हा सुरू केले. मी तिकडे जाऊन पुन्हा त्याला म्हणालो,"इथे आवाज नाही पाहिजे". तो एकदम गप्प झाला. सर्व लोक आमच्याकडे पाहत होते. तो मुलगा पाच एक मिनिटे शांत राहिला व नंतर लोकांसमोर जाऊन हात पसरू लागला. काही लोकांनी त्याला पैसे दिले.
मी ह्या प्रसंगात बरोबर केले, चूक केले माहित नाही, ते जाणण्याची इच्छाही नाही. पण प्रसंगामुळे त्या मुलाला देणार नसतील त्यांनीही बहुधा त्याला पैसे दिले असे अजूनही वाटते. माझा रेल्वे प्रवास अगदीच बंद झाला आहे, त्यामुळे पुन्हा अशा वेळी काय केले असते ठाऊक नाही. पण अजूनही भिकारी डब्यात आल्यावर नुसते तोंड वाकडे करणे, हे आत का येतात असे लोक अजूनही म्हणतात, की त्यांना डब्याबाहेर काढतात, की त्यांना पैसे देतात ?.
असो. मूळ मुद्याकडे. तर आता रेल्वेमध्ये मोठ्या आवाजात गाणी अथवा संगीत ऐकण्यास आणि वाजवण्यास बंदी आहे. पाहू ह्या नियमाचे पालन कसे केले जाते आणि दंड केल्यास कोणाकोणास केला जातो ते.

0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा