गृहकर्ज:
गृहकर्ज घेतले असल्यास त्याची मूळ रक्कम आणि व्याज ह्यांच्या परतफेडीवर करसवलत मिळते.
मूळ रक्कमेची परतफेड कलम 80C नुसार करसवलतीस पात्र आहेत. ह्याची मर्यादा रू. १,००,०००/- आहे.
स्टँप ड्यूटी आणि नोंदणीच्या खर्चावरही करसवलत मिळते. कर्ज घेतले नसल्यासही ही सवलत मिळते.
गृहकर्जाच्या व्याजाची परतफेड ही कलम 24 नुसार करसवलतीस पात्र आहे. ह्याची मर्यादा प्रतिवर्ष रू. १,५०,०००/- आहे.
२०१३ च्या अर्थसंकल्पातील कलम 80EE नुसार गृहकर्जावर रू. १,००,०००/- ची अतिरिक्त करसवलत मिळेल. पण ही सवलत फक्त ह्याच वर्षात लागू असेल. ह्यावर पुढील मर्यादा आहेतः
- हे गृहकर्ज आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ग्राह्य केलेले असावे.
- घराची किंमत रू. ४०,००,०००/- आणि कर्जाची रक्कम रू. २५,००,०००/- पेक्षा जास्त नसावी.
- जर ह्या वर्षात व्याजाची परतफेड रू. १,००,०००-/ पेक्षा कमी असेल, तर पुढील आर्थिक वर्षात उरलेले १,००,००० पर्यंतचे व्याज करमुक्त असेल.
भागीदारीत कर्ज घेताना दोघांना कर्ज मिळू शकते, त्याकरीता सहमालक हा सहअर्जदार असावा. पण सहअर्जदार हा सहमालक असावाच असा बँकेचा नियम नाही. परंतु दोघांनाही करसवलत मिळवायची असल्यास सहअर्जदार हा सहमालक असणे गरजेचे आहे.
टीपः घराचा ताबा घेतल्यावर त्या आर्थिक वर्षापासून ५ वर्षांच्या आत घर विकल्यास, 80C नुसार आधी मिळालेली करसवलत ही रद्द होते, व ती पूर्ण रक्कम घर विकल्याच्या आर्थिक वर्षातील मिळकतीत जोडली जाते.
____________________________________________________________
खाजगी निवृत्ती वेतन योजना (Pension Funds)
विविध निवृत्ती योजनांमध्ये गुंतविलेले पैसे हे कलम 80C नुसार रू. १,००,०००/- च्या मर्यादेपर्यंत करसवलतीस पात्र असतात.
नवीन निवृत्ती वेतन योजना (New Pension Scheme - NPS) मध्ये गुंतविलेले पैसे हे कलम 80CCD मध्ये दर्शविले जातात. पण ते 80C मध्येच असून त्याची मर्यादा एकूण रू. १,००,०००/- एवढीच असते. तसेच एकूण पगाराच्या १०% एवढेच पैसे NPS मध्ये गुंतविले जाऊ शकतात.
वरील दोन्ही योजनांमधून निवृत्तीनंतर मिळालेले पैसे हे त्यावेळी एकूण मिळकतीमध्ये जोडून त्यानुसार कर आकारला जातो.

0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा