जानेवारी महिना उजाडला. जानेवारी म्हणजे आर्थिक वर्ष अखेरीची जाणीव होणे सुरू
होते. आता विविध कंपन्यांमधून कर मोजणीकरीता त्यांच्या कर्मचार्यांकडून त्यांनी
केलेल्या गुंतवणूकीची कागदपत्रे मागण्यास सुरूवात होईल, किंबहुना झालीही असेल.
ज्यांनी ती कागदपत्रे तयार ठेवली असतील त्यांच्याकरीता चांगले. पण ज्यांची
कागदपत्रे तयार नसतील किंवा गुंतवणूकच केली नसेल त्यांनी आता धावपळ करायला पाहिजे.
कारण, उगाच मार्चपर्यंत वाट पाहिली तर कार्यालयातून कर तर कापला जाईलच, परंतु ऐनवेळी
आपल्याला पाहिजे असतील त्या योजना उपलब्ध असतीलच असे नाही. तसेच उपलब्ध असतील त्या
सर्वच योजना खरोखरच चांगल्या असतील असे नाही.
ह्याच अनुषंगाने माझी अर्धवट राहिलेली ही लेखमालिका ही जमेल तेवढी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. गेल्या महिन्यात जीवन विम्याच्या खूप योजना बंद झाल्यात आणि जानेवारी महिन्यात नवीन योजना आणण्यास सुरूवात झाली आहे. त्याचाही जमल्यास आढावा घेईन.

0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा