नवीन सरकार आले आणि माध्यमांनी, विविध करविषयक संकेतस्थळांनी आपापली शक्कल लावून ह्यावेळी थेट करात ही सवलत मिळेल, ही मर्यादा वाढवून मिळेल असे लिहायला, दाखवायला सुरूवात केली आहे. अर्थात हे सगळे अंदाज आणि अपेक्षाच आहेत.
मग मी का नाही माझ्यातर्फे अर्थसंकल्पातील बदल लिहून द्यावेत? :)
१. ५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त, ५-१० लाखांवर १०%, १०-२० लाख २०%, २०लाखांच्या वर ३०%
२. ८०सी मध्ये भरपूर गोष्टी भरल्यात त्या कमी न करता त्याची मर्यादा १ लाखांवरून २ लाख.
३. वाहतूक भत्ता ८००/- रू प्रतिमहिना वरून २०००/- रू प्रति महिना. म्हणजे वार्षिक २४००० रू.
४. वैद्यकीय भत्ता रू. १५००० वार्षिक वरून रू ५००००/-.
५. ज्येष्ठ नागरिकांना TDS रू १००००/- ऐवजी २५०००-३००००/-रू. किंवा मग TDS नाही.
६. ८०डी ची मर्यादा रू. ५००००/-
७. अवयस्क मुलांच्या उत्पन्नावर रू. १५००ची सूट आहे ती रू. ५०००/- प्रति मूल.
८. फूड कुपनची मर्यादा ५०/७५ रू प्रतिदिनावरून १००-१५० रू प्रतिदिन.
९. गृहकर्जाच्या व्याजावर १,५०,००० च्या ऐवजी ३,००,००० लाखांची मर्यादा.
वगैरे वगैरे....
खरे तर ह्यातील काही गोष्टी गेल्या १-२ वर्षांपासून अपेक्षित आहेत. म्हणजे सर्व अर्थ, कर तज्ञ अशी मागणी आणि अपेक्षा करीत आहेत. पण अर्थमंत्र्यांनी सगळ्यांना ठेंगाच दाखवला. म्हणून बहुधा ह्यावर्षी 'अच्छे दिन'च्या नावाखाली एवढे मोठे बदल सांगितले जात आहेत. पण गेल्या काही दिवसांत जे बदल दिसले त्यावरून तर कितपत मिळेल हीच शंका आहे.
तुमचे काय मत आहे?
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा