सर्वांना नाताळ शुभेच्छा.
ख्रिसमस, नाताळ वर भरपूर चित्रपट आले असतील. काही वर्षे आधीपर्यंत विविध
वाहिन्यांवर ख्रिसमस च्या निमित्ताने हे चित्रपट दाखवले जायचे. पण हे प्रमाण सध्या
खूप कमी झाले आहे. अशाच चित्रपटांतील माझा आवडता एक चित्रपट आहे 'मिरॅकल ऑन
थर्टीफोर्थ स्ट्रीट' (Miracle on 34th Street). साधारण १९९४/९५ मध्ये हा चित्रपट
स्टार मूव्हीज वर पाहिला होता. वेगवेगळ्या मोठ्या दुकानांत सांताक्लॉज लहान मुलांना
भेटून त्यांच्याशी बोलत असतात. त्यापैकी एका दुकानात सांताक्लॉज बनलेला माणूस दारू
पिऊन आला असल्याने क्रिस किंगल ला सांताक्लॉज बनविले असते ह्यापासून क्रिस किंगलच
खरा सांताक्लॉज आहे हे सिद्ध करण्यापर्यंतचा प्रवास मला आवडला.
२००६
मध्ये मी ह्या चित्रपटाची VCD ऑनलाईन खरेदी करून मागवली होती. पण तेव्हा मला ह्याच
चित्रपटाच्या १९९४ मधील रिमेकची VCD मिळाली. आता रिमेक बनविताना त्यात थोडेफार बदल
होत असतातच. ते बदल ठिक आहेत पण ह्यातील क्रिस किंगलच खरा सांताक्लॉज आहे हे सिद्ध
करण्याकरीता जे कारण वापरले ते मला रिमेक मध्ये नाही आवडले पण मूळ १९४७ मधील
चित्रपटातीलच आवडले. अजूनपर्यंतही निदान भारतात १९४७ च्या चित्रपटाची VCD/DVD मला
मिळाली नाही. ती शोधण्याच्या प्रयत्नात आहे.
(चित्र स्त्रोतः IMDB)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा