कडकडीत ठाणे बंदला हिंसक वळण
अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात ठाणे बंद
ठाणेकर वेठीला!
शिळफाट्याला इमारत कोसळल्यानंतर अनधिकृत असलेल्या इमारतींवर कारवाई करण्याचे ठाणे महानगर पालिकेने ठरविले. त्याला सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग इतर पक्षांनी विरोध केला. ह्या विरोधाबद्दल ह्या पक्षांकडून ठाण्यात आज बंद पाळण्यात येत आहे. ह्यात शिवसेनाही सामिल आहे.
ह्याबद्दल काय बोलणार? पण साधेसुधे प्रश्न पडतात ते असे...
१. अनधिकृत बांधकाम जेव्हा उभारले जात असते तेव्हा कोणी लक्ष का घालत नाही? ते काय एखादे भातुकलीच्या खेळातील घर नसते, नजरेत न पडायला.
२. अनधिकृत बांधकाम असले तरी ते त्या इमारतीप्रमाणे तकलादू असेलच असे नाही. मग ती इमारत कोसळली हे कारण धरून आत्ताच ही कारवाई कशी?
३. दुसर्या प्रश्नावरून अनधिकृत बांधकाम अधिकृत करावे का असा मुद्दा येतो तो योग्य आहे का?
४. बंद पुकारला असल्यास त्याने आम्हा लोकांना त्रास का द्यावा, जबरदस्तीने बंद करून तुमचे म्हणणे मान्य होते का?
५. आणि ठाणे महानगरपालिका शिवसेनेच्या हातात असून त्यांच्याच कारवाईविरोधात तोच पक्ष ह्या बंद मध्ये सामिल आहे, ह्यावरून नक्की काय सूचित होते?
2 प्रतिक्रिया:
Kiti divas hi mohim chalel dev jaaNe. Faar divas he naatak tiknaar nahi. Anekanche hitsambandh dukhavale jateel.
बरोबर आहे मृदुला.
हे असले प्रकार नेहमीच होत राहणार हेच प्रतित होते.
टिप्पणी पोस्ट करा