आजकाल प्रत्येक ठिकाणी निधर्मी राज्य वगैरे शब्द भरपूर वेळा ऐकायला मिळते. खरं तर त्याचा अर्थ राजकारणी लोक आणि वृत्तमाध्यमं ह्यांनी जात-धर्म ह्यावर अवलंबून ठेवला आहे.
मी सहज मोल्सवर्थच्या मराठी-इंग्रजी शब्दकोषात अर्थ पहायचे म्हणून शोधले तर तो शब्दच त्या शब्दकोषात नाही.
काही महिन्यांपूर्वी, वपुंच्या 'टेकाडे भाऊजी' ह्या आकाशवाणीवर पूर्वी प्रसारीत झालेल्या मालिकेची MP3 सीडी दुकानात मिळाली. त्यात ह्या शब्दाचा वेगळा अर्थ ऐकायला मिळाला.
- शांततेने पार पाडू शकणार्या गोष्टींना वाकडं वळण लावण्याकरीता काही विध्वंसप्रेमी टपलेली आहेत हे काय कमी वेळा सिद्ध झालंय? पुढार्यांची आणि पक्षाची बदनामी, चार गुंडशाही लोकांचा फायदा, शहराचं नुकसान आणि निरपराधांचा गोळीबारात मृत्यू इक्वल टू कोणतंही आंदोलन.
.....
- प्रत्येकानं आपापला धर्म सोडायचा आणि जातीवरून दंगली पेटवायच्या.
- ते ही निधर्मी राज्याच्या नावाखाली.
- मी सांगते, निधर्मी राज्य हा शब्दच फसवा आहे.
- मुळीच नाही, ह्याचा विचारच कुणी आत्तापर्यंत केला नाही. ह्या शब्दाचा अर्थ फार निराळा आहे. अरे, प्रत्येकाने आपापला धर्म पाळायचा म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे कर्तव्य. नोकराने नोकराचा धर्म. व्यापार्याने व्यापार्याचा, विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचा. प्रत्येकाने आपला धर्म पाळला की सगळ्या राष्ट्राचा धर्म एकच होतो.
निधर्मी राज्य म्हणजे काय त्याचा हा अर्थ मला तरी पटला ;)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा