सीएनबीसी आवाजच्या माहितीनुसार फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (एफडीए) रिवाईटल आणि
स्लिम टी ह्या उत्पादनांची चौकशी करीत आहे आणि त्यांना त्याचे वैज्ञानिक पुरावे
मागितले आहेत. जर का त्यात काही खोटेपणा आढळला तर त्यांना दंड लावण्यात येईल.
चला, हे चांगले होईल की ह्यामुळे चुकीचे, अवास्तव परिणाम दाखवून आपला माल विकणार्या लोकांवर ह्याने वचक बसण्याची शक्यता आहे. पण त्यांना आकारण्यात येणारा दंड फक्त १० लाख रूपये? फार कमी वाटतो.
आधीही त्यांनी म्हणे खाद्यतेल
बनविणार्या कंपन्यांनाही अशीच कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
अशाच प्रकारच्या दुसर्या
जाहिराती म्हणजे:
१. 'शुभ धन वर्षा' : आपले आर्थिक संकट दूर करून अमर्यादीत धनसंपदा देते. अशाप्रकारे धन मिळत असेल तर आयकर खात्यानेही ह्यांची चौकशी केली पाहिजे की एवढा पैसा येतो कुठून?
२. 'नजर सुरक्षा चक्र': जाहिरातीतच दाखवल्याप्रमाणे एखाद्या माणसाची नजर लागणारे किरण ह्या कवचाद्वारे दूर ठेवले जातात. अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही ह्यात लक्ष घातले पाहिजे.

तुम्हाला काय वाटते? :)
2 प्रतिक्रिया:
आधी ह्या revital ची जाहिरात युवराज सिंग करायचा, मग त्याला cancer झाल्या पासून सलमान खान जाहिरात करतो आहे.... आता त्याला cancer होतोय का aids होतोय बघायचे आहे
त्यांना कोणता रोग झाला हा भाग अलाहिदा. पण खरोखरच त्याने शक्ति/उर्जा मिळते का हा प्रश्नच आहे. त्यांना पैशाची उर्जा मिळाली हे नक्की.
टिप्पणी पोस्ट करा