तुम्ही बोर्नविटाची नवीन जाहिरात पाहिली आहे का? दूधातून कॅल्शियम खेचण्याकरीता 'ड जीवनसत्व' लागते, जे बोर्नविटा मध्ये आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
http://www.cadburyindia.com/in/en/Brands/Pages/videoplayer.aspx?vid=1734
एक तर त्रासिक जाहिरात, तीन तीन वेळा तिचे विचारणे, "कॅल्शियम करीता काय करतेस?", हावभाव गंमतीशीर (चांगले नाही !!!)
आणि दुसरी गंमत (?) आमच्या शालेय शिक्षणातील अभ्यासाप्रमाणे जी काही माहिती आहे त्याप्रमाणे दुधात कॅल्शियम आणि 'ड जीवनसत्व' आधीपासूनच असते. मग वेगळे 'ड जीवनसत्व' कशाला?
बोर्नविटा आणि दूध कॅल्शियम करीता रस्सीखेच करायला लागले तर पिणार्याला ते मिळेल का? :)
हो, 'दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ' हे म्हणणे इथे लागू होऊ शकते का? ;)
3 प्रतिक्रिया:
अगदी खरय. सेम असंच वाटतं जाहिरात पाहताना. आणि इतकंच ड जीवनसत्त्व हवंय तर सकाळी १० मिनिटं उन्हात जाऊन बसा की म्हणावं...
जाहिरात वाल्यांनी अवघड केल आहे पुढील आयुष्य...
आता नवीन शास्त्र आणि आणि नवीन शस्त्रे शिकावी लागणारेत पुढील पिढीला
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद इंद्रधनू, हो हा नैसर्गिक उपाय ही आहेच.
अभिषेक, आज काल तर लोक अशा प्रकारे समजावत असतात की आपले शिक्षण व्यर्थ होते असेच वाटते :)
टिप्पणी पोस्ट करा