गेल्या आठवड्यात मित्रासोबत 'पिझ्झा हट्' मध्ये खाण्यास गेलो होतो. (साधारणत: चायनीज आणि पिझ्झा मध्ये एक अनुभवतो की खाताना पोट भरल्यासारखे वाटते पण एक दीड तासातच भूक लागते. :) ) असो. तर तिथे बिल मागितल्यावर पाहिले तर खालील प्रमाणे होते.
पदार्थः रू. ३२२.००
सेवा (१०%): रू. ३२.२०
कर (१२.५० %) : रू १४.०९
कर (२०.० %) : रू. २८.९०
एकूण : रू. ३९७
ह्यात एकतर त्यांनी सेवा मूल्य, मूल्यवर्धित कर आणि नुसताच एक कर असे मिळून ३ प्रकारे जादा पैसे लावले होते. मी त्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की सरकारकडून हे कर घेण्यास सांगितले आहे. पण त्याबाबत काही सबळ माहिती त्यांच्याकडे नव्हती. अर्थात ते कमी करणार नाहीतच, आणि माझ्याकडेही जास्त वेळ नव्हता, म्हणून तेवढे पैसे देऊन निघून आलो.
प्रथमदर्शनी ते १०+१२.५+२० = ४२.५% वाटत होते. म्हटले ४०/५० टक्के छुपा अधिभार? चला वॅट काढला, तरी ३०%. म्हणजे लूटालूटच.
आता पुन्हा नीट पाहिले असता, एकूण ४२ टक्के जास्त नाहीत. २३% होतात
तरी त्यांचे गणित मला कळले नाही. कोणी समजावून सांगेल का?
१४.०९ हे ह्यात कशाचे १२.५% होतात?
२८.९० हे ह्यात कशाचे २०% होतात?
आणि सर्वात मोठे गणित..
अशा खाद्यपदार्थांवर नेमके किती टक्के कर द्यायचा असतो आणि ह्यात काय काय ग्राह्य धरावे?
(बोर्नविटा वाले शास्त्रात आणि पिझ्झा हट् वाले गणितात गोंधळवत आहेत.)
9 प्रतिक्रिया:
चालायचंच ;-)
हे वाचा देगा :)
http://wp.me/pq3x8-1Q4
धन्यवाद सुहास.
महेंद्र ह्यांना गेल्या वर्षी तर फक्त सर्व्हिस टॅक्स आणि वॅट द्यावा लागला होता. आता तर त्यांनी आणखी एक कर लावण्यास सुरूवात केलेली दिसतेय. :)
(मी इतरत्र वाचन भरपूर वाढवले पाहिजे असे वाटते, म्हणजे हे प्रश्न भरपूर आधीपासून आहेत हे कळेल ;) )
हो तृप्ती...
अजून भरपूर गोष्टी होत असतील आता :O करीता :)
मी सुद्धा माझ्या घरा जवळ च्या मुलुंड पिझ्झा हट मध्ये गेलेलो.. आम्हाला पण अश्याच प्रकारे अतिशय जास्तीचे बिल दाखवून लुटण्यात आले !
चंगळवादी व भांडवल शाही संस्कृतीचे अनेक फायदे आहेत तसे तोटे सुद्धा
आपण अश्याच एका तोट्या संबंधी सांगितले आहे.
नफा केंद्रस्थानी ठेवून ग्राहकाचा मामा करणे
निनाद,
हो. हे ही मुलुंडचेच होते. :)
ninad,
बरोबर आहे.
चंगळवादी आणि भांडवलशाही, ह्यात आता चंगळवादी संस्कृती फोफावत चालली आहे आणि त्यातही फसवणूक आहे हे लोक लक्षात घेत नाहीत.
हटच्या नावाखाली ग्राहकांचे पैसे कट करण्याच्या धंदा आहे यांचा !!!
हटच्या नावाखाली ग्राहकांचे पैसे कट करण्याच्या धंदा आहे यांचा !!!
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद केदार.
पैसे कट करून नंतर हट् करायचे हाच प्रकार.
टिप्पणी पोस्ट करा