काल कोपिणेश्वर मंदिराच्या जवळ एका संस्थेचा देवी महोत्सव संपला, त्यानंतर देवीला घेऊन जाताना जे संगीत लावले होते त्याने छातीही धडकत होती. सुतळी बाँबपेक्षाही जास्त आवाज, म्हणजे किमान १३० डेसिबल्सच्यावरती आवाज असेल. ह्या कार्यक्रमाला बहुधा काही पोलिस अधिकारीही पाहुणे आले होते. म्हणजे त्यांची उपस्थितीही त्याप्रकारची वाटली.
पुढे गोखले रोडवरही देवीची एक मिरवणूक येत होती, त्याचा आवाजही जबरदस्त. आणि गाणे कोणते लावले होते? तर शूटआऊट अॅट लोखंडवाला मधील "We are the Bhai" हे गाणे.
आणि ह्या लोकांकरीता आपण गर्दी, वाहतूक खोळंबा आणि इतर त्रास सहन करायचे.
धन्य ते नियम, धन्य ते नियम पालन आणि धन्य ती देवीभक्ती.

1 प्रतिक्रिया:
:)
टिप्पणी पोस्ट करा