२६ एप्रिल म्हटले की मला पहिले आठवते ते १९९९ साल. वसतीगृहात आमच्या संगणकाला बंद पाडणार्या विषाणूचा पहिल्यांदा सक्रिय होण्याचा दिवस. त्याने जो काही गोंधळ घातला त्यावरून तो दिवस तर लक्षात तर राहिलाच पण संगणकातील विषाणू काय काय करू शकतात ह्याची प्रचिती आली. त्यानंतर जवळपास ४-५ वर्षे तरी एक खबरदारी म्हणून २६ एप्रिल ही तारीख स्वतःच्या संगणकात येऊ दिली नाही. ;)
त्या दिवसाचा आमचा अनुभव मी आधी लिहिला होता. तो ह्या दुव्यावर पुन्हा वाचता येईल.
आणि Win-CIH विषाणूबद्दल माहिती विकिपिडीयावर ह्या दुव्यावर पाहता येईल.
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा