’तीस मार ख़ान’ ह्या अक्षय कुमार अभिनित चित्रपटाबद्दल गेले काही दिवस ऐकत होतो, पाहत होतो. अक्षय कुमारचे ह्या आधीचे विनोदी चित्रपट आवडले होते ('दिवाने हुए पागल' सारखे अपवाद सोडून) त्याचे अशा चित्रपटांतील कामही आवडत होते. तसेच फराह खान चे ही ह्या आधीचे दोन चित्रपट (’मैं हू ना’ आणि ’ओम शांती ओम’) चांगले वाटले होते. म्हणून हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होतीच. त्यात मग शनिवार २५ डिसें ला हा चित्रपट पहायची संधी मिळाली.
पण चित्रपटाच्या सुरूवातीलाच काही अंशी अपेक्षाभंगाला सुरूवात झाली. पहिल्या प्रसंगापासूनच सर्व लोकांचा म्हणजे सचिन खेडेकर, विजय पाटकर, अक्षय कुमार, अली असगर, कतरीना कैफ, अक्षय खन्ना ह्यांचा अभिनय हा नाटकीच वाटत गेला. आता नाटकी म्हणजे नाटकात पहायला मिळतो तसा नाही. तिथेही सुंदर अभिनय पहायला मिळतो. पण इथे तसला प्रकार नाही. गाणी बरी आहेत. ’शीला की जवानी’ हे बहुचर्चित गाणे मी तरी पहिल्यांदाच पाहिले. ऐकायलाच बरे वाटते. चित्रपटाची कथा तेवढी चांगली वाटली आणि पुर्वार्धापेक्षा उतरार्ध त्यामानाने चांगला आहे, थोडा वेगवान. त्यामुळे मग चित्रपट एकदम आवडला तर नाही पण कंटाळवाणा नाही वाटला. अरे हो, चित्रपटाच्या सुरूवातीचे आणि शेवटचे नामप्रदर्शन चांगले आहे.
फराह खानचा ’ओम शांती ओम’ आला तेव्हा ऐकले होते की ज्यांना ’मै हूं ना’ आवडला नसेल त्यांना ’ओम शांती ओम’ आवडेल. माझ्याकरीता तरी ’मैं हूं ना’ एकदम चांगला चित्रपट होता. ’ओम शांती ओम’ त्यापेक्षा कमी. पण ’तीस मार खान’ एकदमच कमी. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर एका तासात मी हा चित्रपट पाहिल्याचेही विसरून गेलो होतो.
माझ्याकडून तरी चित्रपटाला ५ पैकी २ ते २.५ तारे मिळतील ;)
(चित्रपटाचे चित्र indiafm.com वरून)

3 प्रतिक्रिया:
मैं हूं ना चांगलाच होता...ओम शांती ओम मला पण आवडला नव्हता.
शीला मुळे बॉक्स ऑफ़िसवर थोडी फ़ार कमाइ केली असेल. :)
हा शिनेमा बघायचा मूडच नव्हता..आता हिंमत पण करणार नाही :p
शीला हे गाण मला तरी अजिबात आवडला नाही.
योगेश आणि सुहास,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
जेवढे लोक हा चित्रपट पहायला गेलेत त्यातील बहुतेक शीलाच्या गाण्यामुळेच गेले असतील ;)
टिप्पणी पोस्ट करा