संध्याकाळी 'मैने प्यार किया' चित्रपटातील अंताक्षरी पाहता पाहता ’रूक जा ओ जानेवाली’ गाण्याबद्दल एक आठवले.
हे गाणे राज कपूर दारूच्या बाटलीकरीता गातो की नूतनकरीता? ते पाहण्याकरता युट्युब वर गाणे शोधले आणि लावले. दिसले ते तर दारूची बाटली घेऊनच, नूतन इतरत्र फिरत होती :).
कोणाला ह्याबद्दल माहित आहे का?
हे गाणे संपल्यावर बाजूला इतर गाण्यांचे दुवे दिसले.
मुकेशचे ’ये मेरा दिवानापन है’
मग ’चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये’
मग त्यातच आठवले ’तेरी जुल्फोंसे जुदाई तो नहीं मांगी थी’
त्यानंतर ’तेरे घर के सामने इक घर बनाऊंगा’
मग ’मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम’
त्यावरून ’मेरे मेहबूब कयामत होगी’ ...
एक एक मस्त गाणी...सर्वच आवडती. एकामागोमाग एक ऐकता येतील पण आंतरजालावरील अमर्याद संग्रहात गेलो तर त्याच नादात अख्खी रात्र जाईल.
त्यापेक्षा रेडिओ लावावा किंवा घरातील जुन्या गाण्यांच्या कॅसेट काढून लावाव्यात असा विचार आला. (जुना हा शब्द सापेक्ष आहे)
तर ऐकतो माझा संग्रह उघडून.
डिसेंबर ०४, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा