आज संध्याकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर पाहिले की अमेरिकेत सलग ८६ तास दूरदर्शन पाहणार्या तिघा जणांची गिनिज विश्वविक्रमात नोंद करण्यात आली आहे. तसेच त्यांना १०००० डॉलर्सचे बक्षीसही देण्यात आले आहे. पण ८६ तास त्यांनी काय पाहिले त्याची बातमी मिळाली नाही.
आंतरजालावर बातम्या शोधणे आजकाल कठीण काम नाही. मी ती बातमी शोधायचा प्रयत्न केला. लगेच मिळाली ह्या दुव्यावर. एक '२४' नावाची मालिका पाहत होते ते लोक. तिच्या जाहिरातीकरीता त्या निर्मात्यांनी ही एक स्पर्धा ठेवली होती.
मनात विचार आला, मी ही एवढा वेळ दूरदर्शन पाहत असतो. आपल्या इथेही अशी स्पर्धा ठेवा की, नक्कीच जिंकेन. कारण जिथे सास बहू च्या मालिका, टुकार चित्रपट पचवायची सवय पडली आहे. (गेले काही वर्षे आमच्या घरात तरी त्या मालिका लागत नाहीत. पण चित्रपट तर आपली संस्कृती आहे, आणि चांगल्यातल्या चांगला ते वाईटातला वाईट चित्रपट पाहण्यासाठी विश्वविक्रम नक्की करू शकतो ;)) तिथे स्पर्धेकरीता असे कार्यक्रम पुन्हा पाहून घेऊ.
मग वाटले, कोणता कार्यक्रम ते जरा विचार करावा लागेल. कारण इमोशनल अत्याचार, बिग स्विच, बिग बॊस, राखी का इन्साफ वगैरे (हे मला माहित असलेले आणि डोक्यात जाणारे कार्यक्रम) असेल तर स्पर्धा जरी जिंकलो तरी त्याचा आनंद भोगता येणार नाही. कारण तिकडून थेट वेड्यांच्या इस्पितळात भरती व्हावे लागेल.
पण तेव्हाचे तेव्हा पाहू. आता तरी सलग किती तास दूरदर्शन पाहू शकतो ते मोजायला सुरूवात करू का? स्पर्धेचा बिगुल वाजला की लगोलग कार्यालयातही आठवड्याभराची सुट्टी टाकता येईल. ;)

2 प्रतिक्रिया:
चांगली कल्पना आहे!
त्यांची की माझी ? ;)
टिप्पणी पोस्ट करा