हम आपके हैं कौन?
आजपासून बरोबर २० वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट १९९४ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुरूवातील लग्नाच्या गाण्यांचे चित्रहार, साडे तीन तासांचा लांबलचक चित्रपट म्हणून टीका झाली. पण चांगला चित्रपट आहे आवडला असेही लोक सांगू लागले. निर्माते बडजात्या यांनी चित्रपटाची व्हिडीयो कॅसेट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याच दिवशी बाजारात न आणता, संपूर्ण भारतात फक्त २७ प्रती काढून प्रदर्शित केला आणि त्याची तिकीटही जास्त ठेवली. पण तरीही प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिला.
घरातील मंडळी चित्रपट पाहून आली. आल्यानंतर काही दिवस ह्याच चित्रपटाची चर्चा. त्यामुळे ह्या चित्रपटाविषयी आकर्षण निर्माण झाले होते. पण मला बारावीचे वर्ष असल्याने चित्रपटगृहात जाण्याची संधी मिळाली नाही.
त्यानंतर १ वर्षांनी म्हणजे जुलै १९९५ मध्ये हा चित्रपट पाहण्याचा योग आला, तोही त्यांच्या मुख्य चित्रपटगृहात 'लिबर्टी चित्रपटगृह'. तेव्हा त्यांनी चित्रपटाला ५० आठवडे पूर्ण झाले म्हणून २ गाणी आणि १० दृश्ये नवीन जोडलीत असे ऐकले होते. ती दोन गाणी म्हणजे चॉकोलेट लाईम ज्यूस.. आणि मुझसे जुदा होकर... दृश्ये नवीन कोणती ते कळण्याचा मार्ग नव्हता, पण ह्या गाण्याच्या आधीचे २-३ तर नक्कीच असतील.
म्हणजेच मी पहिल्यांदा चित्रपट पाहिला तो पूर्ण. आधीच्या लोकांनी पाहीला तसा निर्बंधित नाही. ;)
त्यानंतर पुन्हा १ वर्षांनी महाविद्यालयीन काळात पाहिला लोणी येथील चित्रपटगृहात. पहिल्यांदा पाहिला तेव्हा ८० रू तिकीट होते आणि नंतर पाहिला तेव्हा ५ रू तिकीट. पण दोन्ही वेळेला पूर्ण ३:४० तासांचा, २ इंटर्व्हल सोबत.
चित्रपटाच्या कथा आणि गाण्यांबद्दल बोलायला नकोच सर्वांनाच माहित आहे. पण एवढेच सांगतो की हा चित्रपट तेव्हाही आवडला होता, आताही आवडतो. कधीही दूरदर्शन वाहिन्यांवर लागला तर जमेल तेवढा नक्की पाहतो.
2 प्रतिक्रिया:
मी इंग्राजळेला नाही. पण खरंच सांगतो आपले चित्रपट खूप मागे आहेत. कित्येकदा तर त्या प्रसंगी गाणं का असतं तेही कळत नाही. १९६० पूर्वीचे चित्रपट आजही लाख मोलाचे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद विजय.
हो, भरपूर चित्रपटांत हेच दिसले की गाण्यांचा संबंध नाही. पण हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया.. असे काही चित्रपट जरूर आहेत ज्यात प्रसंगानुसार गाणी आहेत, नुसतेच काही सुचले नाही म्हणून नाही. आणि सध्या तर गाणी नसलेले चित्रपटही भरपूर आहेत
टिप्पणी पोस्ट करा