काल संध्याकाळी मुंबई-ठाण्यात पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी बाजारात जाताना काळे
ढग दिसले. अंदाज आला पाऊस पडणार आज. पण एवढ्या लवकर पडेल असे वाटले नव्हते.
दर पावसाळ्यात एक दृष्य नेहमी दिसते. काळे ढग, त्यासमोरून पांढरे पक्षी (बगळेच बहुधा) उडत जातात, त्यांवर सूर्यप्रकाश पडलेला असल्याने त्यांचा पांढरा रंग मस्त उठून दिसतो. हेच दृष्य कालही दिसले. कृष्णधवल :)
परत निघताना विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत होता. घरी वीज गेलेली आहे असे कळले होते.
मला हाच मुद्दा जाणून घ्यायचा आहे. पाऊस निदान(पहिला तरी) पडल्यावर घरांतील वीज का जाते?
महाविद्यालयात असताना वसतीगृहात राहतो होतो लोणी मध्ये. तिथेही हाच प्रकार पाहिला होता. बेंगलूरू ला राहत होतो तेव्हाही हाच प्रकार पाहिला होता. तिथे तसा मी जवळजवळ शहराच्या बाहेरच राहत होतो. ऑफिस घरापासून जवळच. संध्याकाळी/रात्री घरी जाताना पाऊस पडताना दिसला की आधी फोन करून मित्राला विचारायचो की आपल्या भागात वीज आहे का? नसली तर मग आरामात निघायचे, तेवढा वेळ मग ऑफिसमध्ये काम (जास्त वेळा तर टाईमपासच) करून मग निघायचे, वीज आल्यानंतर. :)
आता कालही तेच झाले तेव्हा हे सगळे आठवले आणि मी काहीही अंदाज न लावता पुन्हा तोच प्रश्न विचारतोय, "पाऊस पडल्यावर घरांतील वीज का जाते?" :)

2 प्रतिक्रिया:
पहिला पाउस पडल्यावर बर्याच कारणांनी वीज जाते.
१) बरेचदा पहिला पाउस हा pre mansoon असतो. पावसासोबत वारा भरपूर असतो. वार्यामुळे झाडे पडणे किंवा झाडांच्या फांद्या विजेच्या तारांना घासून short circuit होणे.
२) उघड्या DP मध्ये पाणी घुसून short circuit होणे.
३) असा काही प्रकार होऊ नये म्हणून बरेचदा mseb चे लोक precaution म्हणून वीज बंद करतात.
धन्यवाद अनिकेत.
ही कारणे अपेक्षित होतीच.
१. मान्य.
२. ह्यावर उपाययोजना आधीच केली असली पाहिजे .परंतु होत नाही.
३. ह्याबद्दल साशंक आहे. कारण बहुतेक वेळा हेच ऐकायला मिळते. ह्यावर उपाययोजना करता येऊ शकत नाही का? पावसाळ्याच्या सुरूवातीला ठीक आहे, पण इतर उदाहरणे दिल्याप्रमाणे बहुतेक वेळा हे होतच असते.
टिप्पणी पोस्ट करा