मागील लेखनात भविष्य निर्वाह निधीबद्दल माहिती
पाहिली. त्यातील गुंतवणूक ही प्राप्तीकर नियमाप्रमाणे करसवलतीस प्राप्त असते. पुढील
काही लेखनात गुंतवणूकीचे असेच काही पर्याय पाहू ज्यात गुंतवणूकीवर अवलंबून करसवलत
घेता येते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate - NSC)
सरकारतर्फे टपालखात्याद्वारे उपलब्ध असलेल्या बचतीच्या या योजनेत पैसे गुंतविण्याचा आणखी एक पर्याय आहे. HUF आणि Trust वगळून इतर सर्व लोक ह्यात गुंतवणूक करू शकतात. एखादी व्यक्ती स्वतः आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या अज्ञान मुलांच्या नावे NSC मध्ये किमान रू. १०० ठेवू शकतो. तसेच गरज पडल्यास कर्ज घेताना हे प्रमाणपत्र तारण म्हणूनही वापरता येते. ह्यावर मिळणारे व्याज करपात्र असले तरी ह्यावर स्त्रोतावर कर आकारणी अर्थात TDS आकारला जात नाही. गुंतवणूक करणार्याची ही जबाबदारी असेल की त्याने मिळालेले व्याज स्वतः आपल्या उत्पन्नात जोडून त्यावर कर भरावा.
ह्या बचत प्रमाणपत्रांवर मिळणारे व्याज हे दरवर्षी ठरविले जाते.
मर्यादा:
गुंतवणूकीस कमाल मर्यादा नाही.
मुदतः
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राकरीता दोन मुदतीच्या योजना आहेत.
१. पाच वर्षे: २०१३-१४ ह्या आर्थिक वर्षाकरीता व्याजाचा दर ८.५०% आहे.
२. दहा वर्षे: २०१३-१४ ह्या आर्थिक वर्षाकरीता व्याजाचा दर ८.८०% आहे.
गुंतवणूकीवर कर सवलत:
ह्यात गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस पात्र.
मिळणार्या व्याज/लाभावर कर सवलत :
मिळालेले व्याज करपात्र असले तरी पुन्हा गुंतविल्यामुळे त्यावर्षीच्या करमोजणीत पुन्हा कलम 80C प्रमाणे कर सवलतीस पात्र असते.
मुदतीनंतर मिळालेल्या रकमेवर कर सवलत :
- मुदतीनंतर मिळालेले एकूण व्याज कर सवलतीस पात्र नसते.
ते त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊन त्यानुसार कर मोजणी केली जाते.
ह्याबाबत अधिक माहिती टपाल खात्याच्या संकेतस्थळावर येथे मिळेल.
ज्येष्ठ नागरीक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme - SCSS)
ही योजना टपाल खात्यातर्फेच उपलब्ध असून सर्व ज्येष्ठ नागरीक ह्यात पैसे गुंतवू शकतात. साधारणतः ज्येष्ठ नागरीक ह्याअर्थी गुंतवणूकदाराचे वय ६० वर्षे किंवा जास्त असण्याची अट आहे.
परंतु स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या गुंतवणूकदारांकरीता वयाची मर्यादा ५५ वर्षे व वर अशी ठेवली आहे. पण ह्याकरीता निवृत्तीपासून एका महिन्यात ह्यात पैसे गुंतवावे लागतात.

मर्यादा:गुंतवणूकीस
कमाल मर्यादा रू १५,००,०००/- (पंधरा लाख).
मुदतः पाच वर्षे. मुदतीनंतर पुन्हा ३ वर्षांकरीता मुदतवाढ घेता येते. २०१३-१४ ह्या आर्थिक वर्षापासून मिळणारे व्याज ९.२०% आहे.
गुंतवणूकीवर कर सवलत:
मुदतः पाच वर्षे. मुदतीनंतर पुन्हा ३ वर्षांकरीता मुदतवाढ घेता येते. २०१३-१४ ह्या आर्थिक वर्षापासून मिळणारे व्याज ९.२०% आहे.
गुंतवणूकीवर कर सवलत:
ह्यात
गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस
पात्र.
मिळणार्या
व्याज/लाभावर कर सवलत :मिळालेले
व्याज कर सवलतीस पात्र नसते. ते त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊन
त्यानुसार कर मोजणी केली जाते.
मुदतीनंतर मिळालेल्या रकमेवर कर सवलत :मुदतीनंतर मिळालेले एकूण व्याज कर सवलतीस पात्र नसते. ते त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊन त्यानुसार कर मोजणी केली जाते.
मुदतीनंतर मिळालेल्या रकमेवर कर सवलत :मुदतीनंतर मिळालेले एकूण व्याज कर सवलतीस पात्र नसते. ते त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊन त्यानुसार कर मोजणी केली जाते.
ह्याबाबत
अधिक माहिती टपाल खात्याच्या संकेतस्थळावर येथे
मिळेल.
2 प्रतिक्रिया:
Thanks for sharing this useful investment information. Definitely helpful.
धन्यवाद KattaOnline.
अशीच आणखी माहिती लवकरच लिहून अनुदिनीवर टाकेन.
टिप्पणी पोस्ट करा