वार्यावरची वरात - पु. ल. देशपांडेंचे हे नाटक कधीतरी दूरदर्शनवर पाहिल्याचे पुसटसे आठवते. पण त्यातील नेमके सर्व आठवत नव्हते. नंतर मग २००३ पासून पुलंच्या एक एक करत सर्व कथाकथनांच्या ध्वनीफीती संग्रहात वाढवत गेलो, त्यात ह्याचीही ध्वनीफीत होती.
'वार्यावरची वरात नाटकाची व्हीसीडी बाजारात उपलब्ध आहे असे कळले तेव्हा पाहिले तर त्याच्या पुनर्निर्मित (अर्थात रिमेक) नाटकाची व्हीसीडी होती ती. आधीच्या एक दोन रिमेकच्या अनुभवांमुळे मी ते घ्यायचा प्रयत्न नाही केला. (तो अनुभव काय ते पुढच्या लिखाणात सांगेन). बहुतेकांनी सांगितले होते की पुण्याच्या 'अलूरकर म्युजिक' मध्ये मूळ नाटक मिळेल. पण तिकडून मागवणेही जमले नाही.
आत्ता गेल्या आठवड्यात आमच्या नेहमीच्या म्युजिकच्या दुकानात पाहिले की त्या मूळ नाटकाची व्हीसीडी/डीव्हीडी उपलब्ध आहे. लगेच विकत घेतली. सध्या तरी पाहणे जमले नाही पण ते नाटक पुन्हा लवकरच पाहीन.

2 प्रतिक्रिया:
देवदत्त,
मस्त.मी ओरिजिनल ....मुळ नाटक दूरदर्शन वर त्या काळी बघितले आहे... अ........फ.......ला......तू........न........ एवढेच मी सांगू शकतो. धमाल आहे नुसती..धमाल.ती सगळी भट्टीच काही अशी जमून आली होतीना ? कि आपल्या सारख्याला कमाल वाटते.
सदरहू सी.डी.पुण्यात सुद्धा कुठे मिळते काय? माझ्या वडिलांना न सांगता नुसती लाऊन देईन म्हणतो... नि नंतर त्यांचा फुललेला चेहरा बघीन असे म्हणतोय... काही कळविले तर बरे होईल... धन्यवाद.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद mynac.
फाऊंटन ने ती डीव्हीडी आणली आहे. त्यामुळे सर्वत्र उपलब्ध असण्याची शक्यता आहे. अन्यथा त्यांच्या पुण्याच्या कार्यालयात विचारता येईल.
तसेच http://www.fountainmusiccompany.com/outlets.asp ह्या दुव्यावरून इतर दुकाने कळू शकतील :)
टिप्पणी पोस्ट करा