शनिवारी एका कामाकरीता अंधेरी पश्चिमेला गेलो होतो. तिकडे गेलो ३-४ वर्षांनंतर. पण शाळेजवळ गेलो होतो साधारण १४ वर्षांनंतर. सर्व भाग पूर्ण बदललेला. नवीन इमारती, मेट्रोचे पूल वगैरे वगैरे. तिकडूनच मित्रांना फोन केला. दोन मित्र शाळेजवळच भेटले, एक त्याच्या घराजवळ. त्यांच्याशी गप्पा मारताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 'शाळा' आणि 'दुनियादारी'तील काही भाग समोर आले. :)
मित्रांची खबरबात ऐकताना खूप चांगले वाटत होते. हा इकडे काम करतो, तो तिकडे.. ह्याचे, हीचे लग्न एव्हा एव्हा झाले, ती ह्या कंपनीत काही कामाकरीता गेल्यावर भेटली वगैरे वगैरे. पण ह्या फेरीत शाळेच्या आत जाण्यास नाही जमले. मित्राने सांगितले सुट्ट्या सुरु झाल्यात आजपासूनच. :( पुढील वारीत शिक्षक/शिक्षिकेंनाही नक्कीच भेटेन.
नंतर गेलो मी राहत होतो त्या संकुलात. सरकारी संकुल. आता काही घरे आणि कार्यालय तोडून तिकडे नवीन इमारत बांधलेली पाहिली. २५/३० ओळखीच्या घरांतील फक्त दोन घरांतील व्यक्ती भेटले. इतर सर्व दुसरीकडे रहायला गेले आहेत. तिकडच्याही जुन्या आठवणी येत होत्या. संकुलाची सध्याची स्थिती पाहून वाईट वाटत होते. एक शब्द आठवला 'भकास' :(
आता शाळेतील मित्र आणि राहत्या जागेजवळील शेजार्यांतील काहींशी संपर्क अजूनही आहे, काहींशी नाही. पण असो. सर्वजण आपापल्या जागी समाधानात आहेत हेच चांगले. भेटी तर पुढेही होतच राहतील. फक्त ते जुने दिवस आठवणींतच.

4 प्रतिक्रिया:
मी समजू शकतो. शाळा सुटल्यानंतर ६-७ वर्षानंतर ओर्कुटमुळे मी माझ्या शाळेच्या बॅचची रीयुनियन घडवून आणली होती. खुप छान वाटत आपल्या शाळेच्या मित्रांना भेटून...
देगा, एक-दोन फोटो टाकायचे होते की इथे ...
पोस्ट अर्धवट वाटली.. गलबलून आल्यामुळं जास्त लिहिलं नाही असं वाटतं.. फोटो साठी सुहासला अनुमोदन
सुहास,
हो फोटो काढायला पाहिजे होते असे वाटले. पण ते ही नाही सुचले. खरं तर त्यांच्यासोबत गप्पा मारतच रहावे असेच वाटत होते. :)
आणि अशीच एक रीयुनिअन शाळेनंतर ४ वर्षांनी आम्ही केली होती. १०-१५ मित्रांच्या घरी जाऊन भेटून आलो.. मग एक तारीख ठरविली पार्टी ची :) ते ही वेगळ्या योगायोगानेच... जमल्यास कधीतरी लिहीन त्यावर.
आनंद, पोस्ट अर्धवट वाटत असेल कारण बहुधा भेटही तशीच अर्धवटच होती. :)
हो, सर्व काही लिहिले नाही मी.. फक्त रात्री एकदम वाटले.. शब्दाकोशाबाबत लिहिल्यानंतर दोनच दिवसांत हे ही घडले... मग ह्याबाबत लिहावे.
टिप्पणी पोस्ट करा