एप्रिल ०७, २०११

आज संध्याकाळी कार्यालयात चर्चेचा विषय निघाला होता सॅमसंगच्या नवीन वातानूकूल यंत्राबद्दल. त्यांनी 'व्हायरस डॉक्टर' नावाखाली नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. त्यात H1N1 विषाणूलाही रोखता येते असा दावा केला आहे. तसेच एक पाणी गाळणी यंत्र आले होते, १ करोड विषाणूंना मारण्याचा दावा करणारे. वाटते हे किती खरे असेल? त्याच चर्चेत मी नुकतेच पाहिलेल्या दुसर्‍या औषधाबद्दलही बोलणे झाले. Ecosprin, Disprin ह्या औषधी शेड्युल एच (Schedule H) ह्या प्रकारात येतात तरीही डिस्परीन आपल्याला केव्हाही दुकानात जाऊन घेता येते. वास्तविक तसे नसायला पाहिजे कारण त्यावर लिहिल्याप्रमाणे नोंदणीकृत डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्यायच्या आणि विकायच्या असतात. पण लोक तर डॉक्टरकडेही न जाता थेट औषधांच्या दुकानात जाऊन दुकानदारलाच विचारतात, ह्यावर कोणते औषध घेऊ?





योगायोगाने घरी आल्यानंतर मटावर वरील बातमी वाचली.
अँटिबायोटिक्सचा अतिवापर धोक्याचा!

सर्दी झाली , ताप आला की एखादी अॅन्टिबायोटिक्स घेणे हे आपल्या सरावाचेच झाले आहे . पटकन आराम देणारी ही औषधे तितक्याच मोठ्या प्रमाणावर घातकही असतात . यामुळेच भारताला अॅन्टिबायोटिक्सच्या अतिवापराचा धोका असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे


खरोखर आपल्याइकडे हा धोका जास्तच आहे असे आधीही बातम्यांत आले होते. हे वाचल्यानंतर संध्याकाळचे संभाषण आठवले. आंतरजालावर Schedule H ची माहिती शोधली. ह्या दुव्यावर माहिती मिळाली त्यात होते जे औषधाच्या बाटलीवर/पट्टीवर लिहिले असते. ‘Schedule H drug- Warning : To be sold by retail on the prescription of a Registered Medical Practitioner only’

सोबत असेही कळले की
In addition to the other particulars which are required to be printed or written under these Rules, the label of innermost container of the following categories of drugs and every other covering in which the container is packed shall bear a conspicuous red vertical line on the left side running throughout the body of the label which should not be less than 1mm in width and without disturbing the other conditions printed on the label under these rules, namely: — Narcotic analgestics, hypnotics, sedatives, tranquillisers, corticosteroids, hormones, hypoglycemics, antimicrobials, antiepileptics, antidepressants, anticoagulants, anti-cancer drugs and all other drugs falling under Schedules ‘G’, ‘H’, and ‘X’ whether covered or not in the above list.

लगेच घरातील औषधी काढून पाहिली बहुतेक सर्वांवर ती लाल पट्टी आहे. एक दोन सोडल्या तर. अर्थात आम्ही डॉक्टरांची चिट्ठी दाखवूनच औषधे आणतो. पण काही औषधी अशाच आणल्या जातात.त्या म्हणजे क्रोसिन, पॅरासिटोमोल, कॉम्बिफ्लॅम, बेनाड्रिल, डिस्परीन. त्यातील डिस्परीन वर Schedule H लिहिले नाही. त्यामुळे आमच्या संध्याकाळच्या संभाषणातील हा मुद्दा गैरलागू.

पण तरीही कॉम्बिफ्लॅम हे Schedule H मध्ये येते, आणि तरीही आपण ते केव्हाही जाऊन घेऊन येतो व दुकानदारही चिट्ठी न मागता देतो. बेनाड्रिलही बहुधा त्याच प्रकारात येते. पण विना इशारा दूरदर्शन वर थेट जाहिरात दाखविल्यास त्या इशार्‍याची आणि नियमाची तीव्रता कमी होते असे नाही वाटत? त्या औषधांच्या जाहिरातीसोबत डॉक्टरांच्या परवानगीशिवाय घेऊ नये असे का लिहित/सांगत नाहीत?

आणि जाता जाता पुन्हा तोच प्रश्न. H1N1 किंवा इतरही विषाणूंचा अटकाव करण्याची क्षमता त्या वातानूकूल यंत्रामध्ये खरोखरच आहे का?

4 प्रतिक्रिया:

Kiran Ghag म्हणाले...

these ACs probably contain HEPA filters. these filters are usually used in hospitals.

it still is not a guaranteed mechanism to filter h1n1 virus but can be effective to reduce the amount of virus in air.

अनामित म्हणाले...

मलाही तसच वाटते,थोड्या फार प्रमाणात काम करत असेल तो एसी पण पूर्णतः नाहीच ...बाकी मी मोस्टली औषध गोळ्या घेण्याच टाळतोच,ह्या गोळ्या बर्याचदा तुमच्या नर्वस सिस्टमवर काम करतात मुख्य रोगावर नाही ,त्यामुळे तुम्हाला तात्पुरता आराम मिळत असला तरी तो मुळ रोग बाहेर घालवण्यास तितकीशी सक्षम नसतात शिवाय हळुहळ तुमची नर्वस सिस्टम कमकुवत करतात ....

देवदत्त म्हणाले...

धन्यवाद किरण.
तुम्ही सांगितली ती माहिती मला नव्हती. म्हणूनच मी प्रश्न विचारला होता. आता त्याबाबत आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करेन :)

देवदत्त म्हणाले...

धन्यवाद देवेंद्र.
मी ही औषधी घेण्याचे टाळतोच. पण काही वेळा नाईलाज असतो.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter