वर्ष पाचवीचे. पहिल्या चाचणी परीक्षेच्या आधी इंग्रजीच्या टीचरनी आम्हाला सांगितले,"जो कोणी सर्वात जास्त गुण मिळवेल त्याला माझ्याकडून एक बक्षिस मिळेल."
इंग्रजी शिकवण्यास सुरूवात झाली पाचवीपासून. मी त्या आधी थोडेफार इंग्रजी वाचायचा प्रयत्न करायचो. दुकानांवरील फलकांवरून. पण का माहित नाही आवडता विषय बनत गेला. आणि ह्या चाचणी परीक्षेत ४० पैकी ४० गुण मिळाले होते. उत्तरपत्रिका वाटताना अर्थातच सर्वांचे गुण सांगण्यात आले. तेव्हाच टीचरनी विचारले," काय पाहिजे तुला? चॉकलेट की पुस्तक?" वर्गातील मुले-मुली म्हणायला लागले,"चॉकलेट माग" काही म्हणाले,"पुस्तक". मी विचार केला,"चॉकलेट लगेच संपून जाईल. त्यापेक्षा पुस्तक नेहमी वाचायलाही होईल आणि टिकेलही." म्हणून मग त्यांना 'पुस्तक द्या' असे सांगितले.
पुढील आठवड्यात त्यांनी मला पुस्तक आणून दिले. ते होते इंग्रजी-मराठी शब्दकोश.
त्याआधी आणि नंतरही मला प्रशस्तीपत्रके आणि बक्षिसे मिळाली होती. पण हे बक्षिस नेहमीच माझ्याकरीता खास राहील. आणि जमेल तेवढे वापरातही.

4 प्रतिक्रिया:
sahi !! Quite touching :)
masta aaThavaN aahe :)
धन्यवाद Shree आणि तृप्ती :)
हळवी आठवण ....अविस्मरणीय बक्षीस ... छान ..
टिप्पणी पोस्ट करा