CBFC कडून दिलेल्या जाणार्या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरून पुढे काहीतरी ओळ जोडण्याची प्रथा चालू झाली.
असो. तो माझा आजचा विषय नाही. माझा विषय आहेत एकाच कलाकाराने काम केलेले एकाच नावाचे दोन चित्रपट. मग त्यात दहा वर्षेही गेली असतील किंवा जास्त ही.
त्यातील काही नावे म्हणजे:
'संतान' - कलाकार जितेंद्र. जुना चित्रपट आला होता १९७६ मध्ये. आणि त्यानंतर १९९३ मध्ये. पहिल्या चित्रपटात जितेंद्रनेच संतान साकार केला होता. दुसर्या चित्रपटात दिपक तिजोरीने आणि जितेंद्र ने त्याच्या वडिलांची भुमिका केली होती.
'दिवार' - कलाकार अमिताभ बच्चन. पहिला आला होता १९७५ मध्ये. सह कलाकार शशी कपूर (भाऊ). दुसरा २००४ मध्ये. सह कलाकार अक्षय खन्ना (मुलगा).
'बरसात' - कलाकार बॉबी देओल. पहिला चित्रपट आला होता १९९५ मध्ये. ग्रीक देवतेच्या पुतळ्याप्रमाणे दिसणारा बॉबी देओल (असे मी ’गुप्त’ चित्रपटाच्या परीक्षाणात वाचले होते :) ) नंतर फार चमकला नाही, पण त्याचे चित्रपट मधे मधे येत राहिले. २००५ मध्ये त्याच्या पुन्हा 'बरसात' नावाच्या चित्रपटाचे नाव पाहिले तेव्हा वाटले होते, की ह्याचा पहिला आणि शेवटचा दोन्ही चित्रपट एकाच नावाचे असतील की काय? ;) पण तसे झाले नाही.
मला सध्या तरी आठवत असलेल्या तीन चित्रपटांची ही नावे. तुम्हाला आणखी माहीत असल्यास जरूर सांगा. तेवढीच आपल्या गंमतीशीर ज्ञानात थोडी भर :)
जाता जाता- १९९९ मध्ये आलेल्या 'संघर्ष' ह्या सिनेमात अमन वर्मा ह्या कलाकाराने काम केले होते. त्याचे नाव चित्रपटात दुसरेच होते. पण अक्षय कुमारचे नाव त्या चित्रपटात अमन वर्माच होते. हा योगायोग होता का?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
4 प्रतिक्रिया:
Movie Name : Nastik
1954 - Nalini Jaywant as Heroine
1983 - Nalini Jaywant - as Amitabh's laachar dukhiyaaree andhi maa
धन्यवाद आनंद.
Movie name :Talash
Kareena Kapoor .
1st with Akshay Kumar .(2002)
2nd with Aamir Khan .(2012)
धन्यवाद अनामित :)
टिप्पणी पोस्ट करा