हम पांच, मूवर्स अँड शेकर्स, ऑफिस ऑफिस, कौन बनेगा करोडपती, तारक मेहता का उल्टा चष्मा, सजन रे झूठ मत बोलो...इतरही काही.
दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्या काही मालिका. काही बंद झाल्यात, काही अजून सुरू आहेत, काही पुन्हा सुरू होत आहेत. ह्या मालिका आवडल्याने मी नेहमी पहायचो, पाहतो. सुरूवातीला प्रत्येक भाग आवर्जून पाहिला आहे. पण नंतर त्यात तोचतोचपणा येत गेला मग ते पाहणे बंद होत गेले.
हम पांचः वेगळे विनोद, सादरीकरणामुळे मजा वाटायची. नंतर त्यांचे तेच तेच प्रताप पाहून कंटाळा यायला लागला.
मूवर्स अँड शेकर्सः शेखर सुमनचा हा कार्यक्रम ३१ डिसें १९९७ ला नववर्षाच्या स्वागताकरीता जे कार्यक्रम होतात त्यातच दाखवणार होते. पण लोकांना ते आवडल्याने दर आठवड्याला मग दररोज दाखविणे सुरू झाले. पण शेखर सुमनचे विनोदांची पातळी घसरत गेली आणि माझे पाहणे कमी होत गेले.
ऑफिस ऑफिस: ह्यातही सुरूवातीला नवीन प्रकार, त्यांचे सादरीकरण, विनोद आणि त्यांचे काम. ह्या सर्व गोष्टींमुळे पाहत होतो. नंतर वेळ मिळणे कमी होत गेले व तोचतोचपणा वाटत राहिला.
कौन बनेगा करोडपती: सामान्य ज्ञानाचे प्रश्न, खेळ जिंकण्याची इच्छा आणि अर्थातच अमिताभ बच्चन ह्यांमुळे पाहत होतो. हर्षवर्धन नवाथे जिंकायच्या थोडे आधीपर्यंत नेहमी पाहत राहिलो. मध्ये जाहिरात दाखवली की खेळातला पहिला करोडपती दाखवणार आहेत. ते पाहिले आणि मग कमी होत गेले. दुसरा भाग सुरूवातीला पाहिला, नंतर नाही. तिसरा भाग तर दूरदर्शन संच नव्हता म्हणून पाहणे जमले नाही. मित्राच्या घरी जेव्हा जेव्हा पाहिले तेव्हा कोणी ना कोणी सेलेब्रिटीच दाखवत होते. मग इच्छा नाही झाली.
सध्या तारक मेहता का उलटा चष्मा नेहमी पाहतो. निदान गेली दीड वर्ष. झकास कार्यक्रम. पण काही ह्या वर्षाच्या सुरूवातीपासून नुसते वेगवेगळे इव्हेंट्स दाखवत असल्याने तेवढे भाग आवर्जून पाहिले नाहीत. आता तरी चांगले वाटतेय. नंतर कळेलच.
तसेच सजन रे झूठ मत बोलो. सुरूवातीला वाटले होते की खोटं बोलणे दाखविणे किती दिवस दाखवतील. पण त्यांनी जे एक एक प्रसंग दाखवलेत त्यातून ते कसे बाहेर निघतात (खोटे बोलून) ते पाहून मजा वाटते. आणि कलाकारांचे काम छानच वाटते.
आज पुन्हा कौन बनेगा करोडपती? सुरू झाले. वेगळी वाहिनी पण सादरीकरणात काही खास फरक पडलेला दिसला नाही. चांगलेच वाटले. खेळांच्या नियमांत थोडा बदल केलाय. अर्थात प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमात केवढा फरक पडू शकेल आणि जर बदल केला असता तर तो आपल्याला आवडला असता का? कारण पुन्हा जुन्याशी तुलना सुरू होणार. तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त ९ आठवडेच हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
पाहू लोकांना किती आवडतो आणि मलाही.
ऑक्टोबर ११, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2 प्रतिक्रिया:
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे...
शेवटी रस काढून काढून उरलेल्या उसाच्या चिपाडासारखी स्थिती होते.
मला श्रीमान श्रीमती ही मालिका प्रचंड आवडायची कारण तोचतोचपणाचीच थीम असून त्यातला फ्रेशनेस शेवटपर्यंत टिकून होता!
ह्यावेळीही साचा तोच आहे. तोच तोच पणा म्हणता येईल पण रटाळपणा नाही वाटत.
अर्थात ह्यावेळी प्रश्न कमी आणि गप्पाच जास्त दाखवत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा