ऑक्टोबर ०५, २०१०
- ऑक्टोबर ०५, २०१० १२:१८ AM
- देवदत्त
- कालक्षेत्र, जेटलॅग
- 1 प्रतिक्रिया
टुसान वरून शनिवारी (२ ऑक्टो) सकाळी ११:३६ ला निघालो. २ तास प्रवास, ३:३० तास डेन्वर विमानतळावर, मग ९ तास विमानातून फ्रँकफर्ट, पुन्हा २ तास विमानतळावर आणि ८ तासांत मुंबई. ४ ला पहाटे १२:४५ ला मुंबईला पोहोचलो(सर्व वेळा जवळपास चूभूद्याघा ;) ). ह्या वेळात ३ तारीख मी फक्त फ़्रॆंकफर्ट विमानतळावर पाहिली. त्यामुळे ३ तारीख ही माझ्याकरीता फक्त २ ते २:३० तासांची. थोडक्यात रविवार पाहिलाच नाही असे ही म्हणू शकतो. ह्यावरून मला हिंदीतील ’संडे’ सिनेमा आठवला आणि इंग्रजी 'हँगओव्हर'. अर्थात मला काही हँगओव्हर नव्हता. काय चालले आहे ते माहित होते ;)
मी तिकडे गेलो १० जुलै ला तेव्हा रात्री २:३० चे विमान. टूसॉनला पोहोचलो संध्याकाळी ७:०५ ला. तेव्हा तिकडच्या रात्री १२:३० पर्यंत जागा होतो. टुसॉनची वेळ भारतापेक्षा १२:३० तास मागे. एवढ्या पूर्ण वेळात १० जुलै हीच तारीख होती. त्यामुळे माझ्याकरीता १० जुलै हा दिवस एकूण ३६:३० तासांचा होता. हम्म्म... सर्वात मोठा दिवस :)
आता जेटलॅग चा त्रास अमेरिकेत तरी जाणवला नाही. गेल्यावर्षीही नव्हता जाणवला. दुसर्या दिवसापासूनच वेळ बरोबर जमत गेली. पण मागील वर्षी भारतात परत आल्यानंतर जेट लॅगचा त्रास जाणवत होता. आल्यानंतर ३ दिवस सुट्टी आणि मस्त झोप घेऊनही.
आता ह्यावेळीही पाहतो दिनक्रम किती दिवसांत पूर्वपदावर येतो ते :)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
1 प्रतिक्रिया:
सध्या तरी एकाच आठवड्यात दिनक्रम नियमीत झाल्यासारखा वाटतोय.
टिप्पणी पोस्ट करा