वसंत पुरूषोत्तम काळे उर्फ वपु. ह्यांची पुस्तके कधीपासून वाचायला लागलो आठवत नाही. त्यांच्या कथाकथनाबद्दलही लहानपणी जास्त माहीत नव्हते. पण जेव्हापासुन ऐकले/वाचले, त्यांचे लेखन भरपूर आवडत गेले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या आपल्यासारख्या सामान्य माणसांचे दर्शन त्यांच्या लेखनातून मिळते गेले. मला कसे वाटले? अप्रतिम. आणखी शब्द पाहिजे असतील तर त्यांच्याच पुस्तकातून शोधावी लागतील ;)
त्यांचे 'वपुर्झा' पुस्तक वाचूनच वाटले की जर त्यांच्या ह्या एका पुस्ज्यात,(ज्यात त्यांच्या इतर पुस्तकांतील काहीच परिच्छेद, विचार दिलेत) जर असे चांगले लेखन आहे, तर पूर्ण साहित्य किती अफाट असेल. हळू हळू एक एक पुस्तक वाचत गेलो. तसेच संग्रही जमा करत गेलो. आजच्या घडीला त्यांची ३१ पुस्तके संग्रही आहेत. बाकीची पुस्तके ही लवकरच घेईन.
सध्या माझ्याकडे असलेली पुस्तके:
चिअर्स
|
भुलभुलैय्या
|
निमित्त
|
आपण सारे अर्जुन
|
कर्मचारी
|
घर हरविलेली माणसं
|
मायाबाजार
|
काही खरं काही खोटं
|
सखी
|
मोडेन पण वाकणार नाही
|
प्रेममयी
|
रंग मनाचे
|
हुंकार
|
बाई बायको आणि कॅलेंडर
|
वपुर्झा
|
चतुर्भुज
|
गुलमोहर
|
वपु यांची माणसं
|
वपुर्वाई
| इंटिमेट |
पार्टनर
|
संवादिनी
|
ऐक सखे
|
गोष्ट हातातली होती
|
ठिकरी
|
नवरा म्हणावा आपला
|
तप्तपदी
|
फँटसी एक प्रेयसी
|
रंगपंचमी
|
मी माणूस शोधतोय
|
वपु ८५
|
पुढील यादीतील पुस्तके:
कथा कथनाची कथा
|
महोत्सव
|
झोपाळा
|
माझं माझ्यापाशी
|
तू भ्रमत आहासी वाया
|
वन फॉर द रोड
|
दुनिया तुला विसरेल
|
वलय
|
दोस्त
|
सांगे वडिलांची कीर्ती
|
पाणपोई
|
स्वर
|
प्लेझर बॉक्स १
|
ही वाट एकटीची
|
प्लेझर बॉक्स २
|
का रे भुललासी
|
ह्यात त्यांचे एखादे पुस्तक सुटले असल्यास मला सांगावे, ते ही यादीत जोडेन. :)
2 प्रतिक्रिया:
वपु !!! माझे प्रचंड आवडते.. त्यांचं एकूण एक पुस्तक मी वाचलंय. अनेक पुस्तकं संग्रही आहेत.. एकदा त्यांचं कथाकथन प्रत्यक्ष ऐकण्याचाही योग आला होता. अफाट माणूस होता हा !!
प्रत्यक्ष ऐकणे कधीच नाही जमले. तेव्हा असे काही होते हेच माहीत नव्हते :(
टिप्पणी पोस्ट करा