नाही, यूट्युब वर उपलब्ध असलेल्या ३डी चित्रफीती बनविण्याच्या कृतीबद्दल म्हणणे नाही हे. तर घरी बसून त्रिमिती (3D) चित्रपटाचा आनंद घेता येईल त्याबद्दल. :)
हो, आणि महागडा 3D दूरदर्शन संच ही घ्यायची गरज नाही.
त्रिमिती चित्रपट पाहण्याकरीता गरज काय असते? तर 3D प्रक्षेपण आणि त्याचा खास चष्मा. 3D चित्रपट बनविणार्यांनी आधी त्यांचे चित्रपट नेहमीच्या डीव्हीडीच्या प्रकारात देत होते. पण आता त्यांनी 2D आणि 3D अशा दोन्ही प्रकारात डीव्हीडी बनविणे सुरू केले आहे. डीव्हीडी सोबतच दोन चष्मेही मिळतात.
असेच २ चित्रपट मी विकत आणलेत.
- Ice Age: Dawn of the Dinosaurs
- The Final Destination 4
तिसरा आहे उपलब्ध The Polar Express तो आणेन नंतर कधीतरी :)
दोन्ही चित्रपट २००९ मध्ये चित्रपटगृहात पाहिले होते. आणि आता ह्या डीव्हीडीवर.
दोन्ही डीव्हीडीपैकी Ice Age चा त्रिमिती दर्जा चांगला वाटला. पण Final Desination नाही. बहुधा चष्यांचाही दोष असेल. नीट पहावे लागेल.
आणि ह्याचे २ आणि त्याचे २ असे मिळून ४ चष्मे असले तरी एकाच चित्रपटाला चारही वापरता येत नाहीत. कारण दोघांच्याही प्रणालीत थोडे वेगळेपण आहे. एकात लाल आणि निळा रंग वापरला आहे, दुसर्यात लाल आणि निळा. आणि लाल रंग एकात डाव्या डोळ्याला आहे दुसर्यात उजव्या.
हे एक सोडले तर घरी बसून 3D चित्रपट पाहणे सोपे झाले म्हणता येईल.