मार्च २९, २०११




भविष्य : भारत वर्ल्डकप जिंकणार!


चढतोय वर्ल्डकप फीवरचा पारा
भारत-पाकिस्तान उपांत्य सामन्याच्या निमित्ताने संपूर्ण देश क्रिकेटमय झाला असून देशातील बहुतांश कंपन्यांमध्ये बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विविध राजकीय विचारधारांमध्ये गुरफटलेले मध्य प्रदेश विधानसभेतील आमदार सोमवारी आपापसातील मतभेद विसरून एका मागणीसाठी खांद्याला खांदा लावून सरसावले. त्यांच्या या मागणीपुढे विधानसभा अध्यक्षांनाही नमते घ्यावे लागले. ही मागणी होती, बुधवारी, ३० मार्च रोजी विधानसभेचे कामकाज अर्ध्या दिवसानंतर बंद ठेवण्याची.

सामना :
मॅच बघण्यासाठी आमदारांना हवी अर्धा दिवस सुट्टी
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना सर्व आमदारांना पाहायला मिळावा म्हणून विधिमंडळाचे त्या दिवशीचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत संपविण्यात यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज केली. संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांची ही मागणी सरकारला मिळाली आहे, असा दुजोरा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला.

महाराष्ट्रातील मंत्र्यांना हवेत क्रिकेट पास
विश्‍वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यात मग आपले महाराष्ट्रातले नेते तरी मागे का राहातील. म्हणूनच, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांनी हा सामना पाहण्यासाठी सरकारकडे पासची मागणी केली आहे.

येत्या बुधवारी मुंबई बंद!

क्रिकेटसाठी ऑपरेशन पुढे ढकलले

हे तर नमुन्यादाखल काही आहे. मी पाहिलेल्या वृत्त संकेतस्थळांवरील भातातील एक शित.

स्टार माझा वर एक बातमी दाखवत होते त्यात सर्व खेळाडूंना देवांच्या तसबिरीत बसविले आहे. त्यांच्या चित्राचे पूजन करत असतील तरी जास्तच वाटते. पण इथे तर हिंदू देवतांच्या प्रतिमेतील चेहऱ्यात त्यांचे चेहरे बसवले होते.
इथे त्या तथाकथित देव मानणाऱ्या लोकांना राग येत नाही?

गेल्या वेळी २ एकदम विरुद्ध छायाचित्रे एकत्र ओर्कुट वर पाहिली होती. एकात भारतीय क्रिकेट खेळाडूंची पूजा करत आहेत. बाजूच्याच छायाचित्रात भारत सामन्यात हरल्यामुळे खेळाडूंच्या घरावर दगडफेक की काळे फासत असल्याचे.  आता शोधूनही मिळाली नाहीत ती चित्रे.

अति होतंय आता. क्रिकेट मलाही आवडायचं. पण ह्याच अतिरेकामुळे ते नावडते झाले आहे.

मार्च २८, २०११

रेल्वेत मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यास बंदी
 
आज ही बातमी वाचली. लगेच मनात विचार आला, उपनगरी गाड्यांमध्ये जे भिकारी मोठमोठ्याने गाणे ओरडत असतात (ओरडतच हो, नीट थोडी असतात. एखादाच क्वचित) त्यांच्यावरही हा नियम लागू करतील का? ह्या सर्व गोष्टी आपल्याकरीताच असतात.

ह्यावरूनच ५/६ वर्षांपुर्वीचा प्रसंग आठवला. दादर-ठाणे प्रवास दुसर्‍या वर्गातून करत होतो. एक ८/१० वर्षांचा मुलगा आला, गाणं ओरडत आणि हात पसरून. लोक बोलत होते, "काय रे हा वैताग?" असे नेहमीच म्हणतात. त्या दिवशी मी ही जास्तच वैतागलेलो होतो. उठलो आणि त्या मुलाला रागावून सांगितले, "इथे आवाज बंद पाहिजे". तो भांबावून गप्प झाला. नंतर दुसर्‍या दरवाज्यात जाऊन पुन्हा सुरू केले. मी तिकडे जाऊन पुन्हा त्याला म्हणालो,"इथे आवाज नाही पाहिजे". तो एकदम गप्प झाला. सर्व लोक आमच्याकडे पाहत होते. तो मुलगा पाच एक मिनिटे शांत राहिला व नंतर लोकांसमोर जाऊन हात पसरू लागला. काही लोकांनी त्याला पैसे दिले.

मी ह्या प्रसंगात बरोबर केले, चूक केले माहित नाही, ते जाणण्याची इच्छाही नाही. पण प्रसंगामुळे त्या मुलाला देणार नसतील त्यांनीही बहुधा त्याला पैसे दिले असे अजूनही वाटते. माझा रेल्वे प्रवास अगदीच बंद झाला आहे, त्यामुळे पुन्हा अशा वेळी काय केले असते ठाऊक नाही. पण अजूनही भिकारी डब्यात आल्यावर नुसते तोंड वाकडे करणे, हे आत का येतात असे लोक अजूनही म्हणतात, की त्यांना डब्याबाहेर काढतात, की त्यांना पैसे देतात ?.

असो. मूळ मुद्याकडे. तर आता
रेल्वेमध्ये मोठ्या आवाजात गाणी अथवा संगीत ऐकण्यास आणि वाजवण्यास बंदी आहे. पाहू ह्या नियमाचे पालन कसे केले जाते आणि दंड केल्यास कोणाकोणास केला जातो ते.

मार्च २६, २०११


काही दिवसांपूर्वी मी रस्त्यावर पाहिलेल्या नगांविषयी लिहिले होते. त्यात एक होते पेट्रोलपंपासमोर फटाके लावणारे. तसाच एक प्रकार आहे भ्रमणध्वनी (मोबाईल) वापरणार्‍यांचा.

आजकाल लोकांना भ्रमणध्वनी वापरण्याची एवढी सवय झालीय की गाडी चालवताना संच वाजला आणि तो वापरला नाही तर आपला नंबर बंद करून टाकतील की काय अशी त्यांना भीती असावी बहुधा. एका हातात भ्रमणध्वनी ठेवून अर्धे लक्ष त्यात व अर्धे समोर ठेवून कार/दुचाकी चालविणारे, मान तिरकी करून कान आणि खांद्याच्या मध्ये संच अडकवून दुचाकी चालविणारे सगळीकडेच दिसतात. पेट्रोलपंपावर असतानाही रांगेत वाट पाहत फोन लावत राहणे चालूच असते. मग समोर पेट्रोलपंप चालकाने मोठा फलक लावला असेल तरी त्याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.


मी तर जमेल तेव्हा भ्रमणध्वनी संच बंद करूनच पेट्रोलपंपवर जातो. किंवा नाहीच जमले तर वापरणे टाळतो. ह्यामागची ऐकलेली कारणे म्हणजे:
  1. भ्रमणध्वनीमध्ये वापरताना त्याच्या कळफलकांमध्ये ठिणगी पडणे बहुतेक वेळा होत असते. आणि पेट्रोलपंपवर पेट्रोल/डिझेल ची वाफ तरंगत असते. त्या ठिणगीमुळे वाफ पेटू शकते.
  2. मोबाईलच्या लहरींच्या उत्सर्गामुळे पेट्रोल मध्ये आग लागू शकते.
  3. आणि त्यांनी सांगितले आहे म्हणून ;) (त्यांनी म्हणजे भ्रमणध्वनी बनविणारे आणि पेट्रोलपंप चालक)
  4. इतरही  कारणे आहेत.
ह्यातील पहिले कारण लगेच पटते. दुसर्‍या कारणाचे म्हणायचे तर मोबाईलचे एवढे टॉवर लावून ठेवले आहेत जागोजागी. त्यांतील लहरींच्या उत्सर्गाच्या आसपास तर मग एकही पेट्रोलपंप नको. पण ते कितपत जोखमीचे आहे माहित नाही.

आणि आणखी एक प्रश्न मला पडायचा, पेट्रोलपंपापासून किती अंतरापर्यंत भ्रमणध्वनी वापरायचा नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर मला गेल्या शनिवारी मिळाले, पेट्रोलपंपवरच. गाडीत हवा भरण्यासाठी पेट्रोलपंपवर गेलो होतो. तिकडे रांगेत गाडी लावून होतो. उजव्या बाजूला एक मुलगी दुचाकीवर बसून भ्रमणध्वनी वापरायचा प्रयत्न करत होती. तिला मी आठवण करून दिली की इकडे भ्रमणध्वनी वापरू नये. तिने ऐकून लगेच संच ठेवून दिला. (लगेच ऐकणारी माणसेही भेटतात हो. उगाच लोक ऐकत नाहीत असे नको म्हणायला ना? ;) )
आणखी वेळ लागणार होता. तेवढ्यात पाहिले की त्या पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक (की मालक?) भ्रमणध्वनीवर बोलत उभा आहे. त्याला सांगितले, "दादा, इकडे लोकांना आपण सांगतो की पेट्रोलपंपवर मोबाईल वापरू नका आणि तुम्हीच वापरताय." तो म्हणाला," हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण म्हणूनच मी बाहेर येऊन बोलतोय." मी: " म्हणजे? कुठे बाहेर?" तेव्हा त्याने सांगितले की, "आपण पेट्रोल भरतो तिकडे वर जे छत बनविले असते त्याखाली भ्रमणध्वनी वापरणे धोक्याचे आहे. त्या भागात पेट्रोलची वाफ असते. आणि तिकडे अडचण येऊ शकते. " (त्या छताला काहीतरी नाव सांगितले ते मी विसरलो) मी म्हणालो," हो ते वाफेबद्दल माहित होते पण क्षेत्रफळाबद्दल माहित नव्हते." तो म्हणाला," तुम्ही केले ते ठीकच आहे. क्वचितच लोक असे करताना दिसतात"

माझ्या वागण्याबद्दलचे जाऊ द्या. पण ही माहिती माझ्या करीता नवीनच होती किंवा माझी आधीची माहिती बरोबर असली तरी अपूर्ण होती असेच म्हणावे लागेल. पण तरीही एक प्रश्न पडलाय, जाणकारांनी उत्तर द्यावे. पेट्रोलची (किंवा इतरही असल्याने इंधनाची) वाफ फक्त त्या क्षेत्रफळातच राहील का? ती आसपास पसरण्याची शक्यता नाही का?

मार्च १८, २०११


जालरंग प्रकाशनाचा होळी विशेषांक हास्यगाऽऽरवा २०११ आता आम्ही आपल्या हाती देत आहोत. ह्या अंकातील विविध प्रकारच्या साहित्यामुळे आपल्या आयुष्यातले चार क्षण जरी हसरे व्यतीत झाले तरी आम्ही केलेल्या प्रयत्नात आम्ही यशस्वी झालो असे समजू.

मार्च १२, २०११

नवीन दुचाकीला मिळणारी मोफत सेवा कशाप्रकारे असते? म्हणजे ती मोफत सर्व्हिसिंग म्हणतात ती.



पहिली मोफत सर्व्हिसिंग - ५०० किमी किंवा ३० दिवस ह्यात जे आधी होईल तेव्हा.
दुसरी मोफत सर्व्हिसिंग - ५००० किमी किंवा २४० दिवस ह्यात जे आधी होईल तेव्हा.
तिसरी मोफत सर्व्हिसिंग सुद्धा १०००० किमी किंवा २४० दिवस ह्यात जे आधी होईल तेव्हा?

कोणी मला समजावून सांगेल का दुसरी आणि तिसरी दोन्ही सर्व्हिसिंग मी २४० दिवसांच्या आतच कशी (आणि का) करून घ्यायची?

३५५ दिवस झाल्यानंतर गेलो तर म्हणतात, "२४० दिवसांच्या वर झालेत. आता फुकटात काम होणार नाही"

दुसर्‍या वेळी ५००० किमी किंवा २४० दिवस म्हणतात. ५००० किमी नाही झालेत पण २४० दिवस संपलेत म्हणून दुसरी सर्व्हिसिंग करवून घेतली.

आता तिसर्‍या सर्व्हिसिंगच चे काय?

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter